Bawankule On Mohite Patil : मोहिते पाटलांच्या राजीनाम्यावर बावनकुळेंची नाराजी; ‘मोदींच्या निवडणुकीत राजीनामा देणं योग्य नव्हतं’

Lok Sabha Election 2024 : रणजितसिंह मोहिते पाटील हे विधान परिषद आमदारकीच्या राजीनाम्याबाबत मला काही बोलले नाहीत. रणजितसिंह यांची भूमिका महायुतीसोबत राहण्याची आहे. ते आमच्या सोबत राहतील.
Chandrashekhar Bawankule-Dhairyasheel Mohite Patil
Chandrashekhar Bawankule-Dhairyasheel Mohite PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 12 April : धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा दिलेला राजीनामा मिळाला आहे. त्यांचा राजीनामा आम्ही स्वीकारलेला आहे. मोहिते पाटलांनी त्यांचा निर्णय घेतलेला आहे. त्यांची मान, प्रतिष्ठा ठेवण्याचा आम्ही कायम प्रयत्न केला. त्यात आम्ही कोठेही कमी पडलो नाही. मात्र, पंतप्रधान मोदींच्या निवडणुकीत त्यांनी असा राजीनामा देणं योग्य नव्हतं, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोहिते पाटील यांच्या राजीनाम्यावर भाष्य केले.

माढा लोकसभा मतदारसंघातून (Madha Lok Sabha Constituency) निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी गुरुवारी (ता. 11 एप्रिल) ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule) यांच्याकडे दिला. तो राजीनामा बावनकुळे यांनी स्वीकारला. त्याबाबत सोलापूरच्या दौऱ्यावर असलेले बावनकुळे यांना विचारले असता, त्यांनी मोहिते पाटील यांच्या निर्णयावर नाराजीच्या सूरात प्रतिक्रिया दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chandrashekhar Bawankule-Dhairyasheel Mohite Patil
Madha Lok Sabha 2024 : मोहिते पाटलांचं ठरलं; रविवारी राष्ट्रवादीत प्रवेश; अर्ज भरायला 16 रोजी पवार सोलापुरात येणार

मोहिते पाटील यांनी पंतप्रधान मोदींच्या निवडणुकीत असा राजीनामा देणं योग्य नव्हतं, मात्र त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि जनता मोदींच्या पाठीशी आहे, असे सांगून बावनकुळे म्हणाले, रणजितसिंह मोहिते पाटील हे विधान परिषद आमदारकीच्या राजीनाम्याबाबत मला काही बोलले नाहीत. रणजितसिंह यांची भूमिका महायुतीसोबत राहण्याची आहे. ते आमच्या सोबत राहतील. शरद पवारांनी टाकलेला हा डाव वगैरे काही नाही. आमच्याकडे दररोज हजारोंनी पक्षप्रवेश होत आहेत.

संजय मंडलिक यांनी कोल्हापूरचे शाहू महाराज यांच्याबाबत केलेले विधान याबाबत मंडलिक यांनीच उत्तर दिले पाहिजे. त्यांनी नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं पाहिजे, असे सांगून मंडलिक यांच्या विधानाचा चेंडू बावनकुळेंनी शिवसेनेच्या कोर्टात ढकलून दिला. प्रकाश आंबेडकरांबाबत ते म्हणाले, जेव्हा विरोधक मोदींचे आई-वडील काढतात, शिव्या देतात. तेव्हा समजून जायचं मोदी अगली बार 400 पार होणार आहेत. पायाखालची वाळू सरकल्यानंतर अशी वक्तव्यं येतात.

Chandrashekhar Bawankule-Dhairyasheel Mohite Patil
Lok Sabha Election 2024 : कोल्हापूरच्या आखाड्यात सोमवारपासून शड्डूंचा आवाज घुमणार; अर्ज भरायला उद्यापासून सुरुवात

ईडीच्या कारवाया भाजपपेक्षा काँग्रेस सरकारच्या काळात जास्त झाल्या आहेत. या कारवाया भाजप करत नाही. ज्या सर्च रिपोर्टमध्ये येतात. त्यात कमी जास्तपणा आढळला तर चौकशी करतात. महाविकास आघाडीने आमच्या 50 ते 100 लोकांच्या चौकशी केल्या. त्यामुळे या कारवयांमध्ये प्रधानमंत्री किंवा मुख्यमंत्री प्रत्यक्ष सहभागी नसतो, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

महायुतीच्या जागावाटपाची काहीही काळजी करू नका. अर्ध्या तासाची बैठक होईल आणि तिढा सुटेल, असे सांगून बावनकुळे म्हणाले, शरद पवारांना या वयात असं बोलणं शोभत नाही. सर्वांचे पालक म्हणून त्यांनी परिवाराला सांभाळलं असेल मात्र परिवारात काही मतमतांतर झाली असतील. मात्र, घरातील वरिष्ठ व्यक्तीने अशा पद्धतीने बोलू नये. त्यांना सल्ला देण्याइतपत मी मोठा नाही मात्र महाराष्ट्राची, देशाची संस्कृती आहे. त्याप्रमाणे मोठ्यांनी लहान माणसाबद्दल थोडं आदराने बोललं पाहिजे.

Edited By : Vijay Dudhale

R

Chandrashekhar Bawankule-Dhairyasheel Mohite Patil
Dr. Babasaheb Deshmukh : मोहिते पाटलांसोबत पवारांना भेटणारे डॉ. बाबासाहेब देशमुख कोण आहेत?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com