Laxman Hake  sarkarnama
मराठवाडा

Hake vs Jarange : बीड जिल्हा कोणाच्याही बापाची जहागिरी नाही: हाकेंनी जरांगेंना ठणकावलं

Political News : बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार मेळावा मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. या मेळाव्यास राज्यभरातील दिगग्ज नेतेमंडळीने हजेरी लावली आहे.

सरकारनामा ब्युरो

Beed News : बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार मेळावा मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. या मेळाव्यास राज्यभरातील दिगग्ज नेतेमंडळीने हजेरी लावली आहे. यावेळी बीड जिल्हा हा कोणाच्याही बापाची जहागिरी नाही, असे म्हणत ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार टीका केली.

बीडमधील संभाजी महाराज क्रीडांगणात होत असलेल्या ओबीसींचा महाएल्गार मेळाव्यास मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री धनंजय मुंडे, आमदार गोपीचंद पडळकर यांनी हजेरी लावली आहे. यावेळी हाके यांनी मनोज जरांगेकडून उठसूट छगन भुजबळांवर टीका केली जात असून वारंवार भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असल्याबद्दल टीका केली.

भुजबळ साहेब तुम्हाला बीडमध्ये येऊ दिले जाणार नाही, असे बीडमध्ये काही जण म्हणत होते. अरे बीड जिल्ह्याची भूमी आहे. मी एक जीआर घेऊन आलो आहे. ज्यामध्ये ओबीसीचे आरक्षण संपवणार आहे. यामध्ये असे नमूद केले आहे की, पहिल्यांदा राज्य मागासवर्ग आयोग बरखास्त करा. मराठा समाज आणि कुणबी समाज एकच आहे, असे म्हणणे म्हणजे सामाजिक मूर्खपणा आहे, अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली.

आरक्षण म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नाही. त्यामुळे राज्य सरकारकडून राज्यातील आरक्षणाचे संरक्षण झाले पाहिजे. त्याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे, असे आवाहन लक्ष्मण हाके यांनी केले. या मेळाव्यासाठी ओबीसी समाज बांधवांनी मोठी गर्दी केली आहे.

"हा जरांगे चौथी पास. त्याने राज्याच्या पहिल्या नागरिकाला त्यांच्या आई-बहिणीवर शिव्या दिल्या, अशा शब्दांत लक्ष्मण हाके यांनी टीका केली. प्रत्येक वेळी आम्हाला न्यायालयात जाऊन जर दाद मागावी लागत असेल तर तुम्हाला आम्ही मतदान का केले? असा सवाल त्यांनी या निमित्ताने विचारला.

प्रकाश सोळंके, बजरंग बाप्पा तुम्हाला आम्ही मतदान दिले आहे. तुम्ही आपली भूमिका कधी स्पष्ट करणार? तुम्हाला ओबीसीचे आरक्षण पाहिले असेल तर तुम्हाला जन्माने ओबीसीमध्ये यावे लागेल. आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही, असेही लक्ष्मण हाके म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT