sandeep shirsagar  sarkarnama
मराठवाडा

Beed Incident : "जाळपोळ प्रकरणात संदीप क्षीरसागरांनी सोयीनुसार भूमिका बदलली"

Case of Beed Arson :  ठाकरे गटाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अनिल जगताप यांचा आरोप 

Datta Deshmukh

Beed News : बीड शहरात झालेल्या दगडफेक, जाळपोळ प्रकरणात आमदार संदीप क्षीरसागर यांनी सोयीनुसार वेळोवेळी आपली भूमिका बदली आहे. त्यामुळे क्षीरसागर यांचा दुट्टपी पणा समोर आला असून त्याचा त्रास मराठा समाजातील लोकांना होत असल्याचा आरोप शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख अनिल जगताप यांनी केला आहे.  

माजलगाव व बीड शहरात ऑक्टोबरमध्ये विविध ठिकाणी जाळपोळ व दगडफेकीच्या घटना घडल्या. यात नगर रोडवरील आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घरावरही दगडफेक करुन वाहने तसेच इतर साहित्य जाळण्यात आले. याबाबत संदीप क्षीरसागर यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुद्दा उपस्थित केला होता. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत करण्याचे जाहीर केले आहे. यावर शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अनिल जगताप यांनी पत्रक काढून संदीप क्षीरसागर यांच्यावर आरोप केले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

 जगताप म्हणले, यापूर्वी कुठल्याच अधिवेशनामध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांनी मराठा आरक्षणावर ‘ब्र’ शब्दही काढला नाही. क्षीरसागर यांनी प्रत्येक वेळेस त्यांनी फक्त मतांसाठी मराठा समाजाचा वापर केला आहे. आणि आता नाहक मराठा समाजाला गुंतवण्याचा प्रयत्न जर आमदार करत असेल तर त्यांना मराठा समाज कदापिही माफ करणार नाही. एसआयटी स्थापन केल्यानंतर सर्वसामान्यांना याचा नाहक त्रास होणार आहे, असेही जगताप म्हणाले.  

जाळपोळी यावेळी ही आमदार संदीप क्षीरसागर यांनी पोटात एक व ओठात एक अशी भूमिका घेतली आहे. आता हिवाळी अधिवेशनामध्ये एसआयटी स्थापन करण्याची मागणी केल्याने त्यांची मराठा समाजाबद्दलची भावना दिसून येत आहे. एसआयटी स्थापन झाल्यास या गुन्ह्यांच्या तपासात सर्वसामान्याना व त्यातली त्यात मराठा समाजाला नाहक त्रास होणार आहे. या त्रासाला पुर्णतः क्षीरसागर जबाबदार असतील, असेही अनिल जगताप म्हणाले.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT