Santosh Deshmukh, dhananjay deshmukh  Sarkarnama
मराठवाडा

Dhananjay Deshmukh On Beed Jail News : बीडच्या जेलमधील भानगडी, धनंजय देशमुख मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार!

Santosh Deshmukh murder case News : बीडच्या कारागृहात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडसह अन्य आरोपी कैदेत आहेत.

Jagdish Pansare

Beed Politics News : बीडच्या कारागृहात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडसह अन्य आरोपी कैदेत आहेत. या कैद्यांना जेल प्रशासनाकडून व्हिआयपी ट्रिटमेंट दिली जाते, त्यांना जेलमध्ये मोबाईल वापराची मुभा, घरचे जेवण दिले जाते, असे आरोप वारंवार केले गेले. काल जेलमधील एका कैद्याने आपल्या वाल्मीक गँगच्या सुदर्शन व प्रतिक घुले यांनी जबर मारहाण केल्याचा दावा आॅडिओ क्लीपमधून केला होता.

तर आज त्याच अझहर पठाण नावाच्या कैद्याने वाल्मीक कराड यांची बदनामी करण्यासाठी हा काॅल करण्यासाठी आपल्यावर जेलमधील कर्मचारी व दोन कैद्याचा दबाव होता, असा दावा करणारे पत्र कारागृह अधिक्षकांना पाठवले आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय देशमुख यांनी जेल प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि ते कोणाच्या दबावात काम करतात? या संदर्भातील माहिती देण्यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सांगीतले.

कारागृहातील कैदी अझहर पठाण यांनी या आॅडिओ क्लीपचे कनेक्शन थेट मस्साजोगच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीशी जोडले आहे. यावर जेल प्रशासनाचा कारभार कायमच वादग्रस्त राहिला आहे. प्रशासनाने आपली जबाबदारी नीट पार पाडायला हवी पण ती त्यांनी पार पाडली नाही. ते कोणाच्या दबावात काम करतात? या संदर्भातील संपूर्ण डाटा आमच्याकडे आहे. तो आम्ही वेळोवेळी दिला आहे.

संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासून जेल प्रशासनाची भूमिका ही बेजबाबदारपणाची राहिली आहे. हा सगळा प्रकार आता मुख्य वेळ घेऊन त्यांना सांगणार आहोत आणि जेल प्रशासनावर कारवाईची मागणी करणार आहोत, असे धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केले.

बीड जिल्हा कारागृहात जेलर बदलीपासून जे प्रकार होत आहेत ते कारागृह प्रशासनाने गांभीर्याने घेतले पाहिजेत. परंतु तसे होताना दिसत नाही. याबाबत मी येत्या काही दिवसात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन एक अर्ज देणार आहे. कारागृहातील कैद्यांना कोण अभय देत आहे, त्यांना कशाप्रकारे ट्रीटमेंट दिली जात आहे. या संदर्भात चर्चा करून गंभीर पावले उचलण्यासाठी मी विनंती करणार असल्याचे देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT