Beed News : बीड लोकसभा मतदारसंघाची लढत सर्वाधिक चर्चेची आहे. भाजप उमेदवार पंकजा मुंडे मैदानात असलेल्या या ठिकाणी स्वत: शरद पवारांनी लक्ष घातले आहे. महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे रिंगणात आहेत. यामुळे मुंडे यांच्यासमोर पुन्हा एकदा सोनवणे यांचे आव्हान असणार आहे. (Latest Marathi News)
बीड जिल्हा हा मराठा आरक्षणाचे केंद्रस्थान म्हणूनही याकडे पाहिले जाते. कारण मराठा आरक्षणासाठी राज्यव्यापी आंदोलन पुकारणारे मनोज जरांगे पाटील हे ही मूळचे बीड जिल्ह्याचे आहेत. जरांगे पाटीलही वारंवार बीड जिल्ह्यात दौरे करत असतात. आताच्या लोकसभा निवडणुकीसाठी आपल्याकडून कोणतेही उमेदवार उभे करणार नाही, असे जरांगेंनी जाहीर केले होते. मात्र त्यांच्याच एका शिलेदाराने आता बीडमधून रणशिंगे फुकले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला.यावेळी त्यांच्यासोबत बंधू धनंजय मुंडे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात भाष्य केले होते. तसेच प्रतिस्पर्धी उमेदवार सोनवणे यांच्या कुणबी प्रमाणपत्रावरही वक्तव्ये केले होते. यावर आता सोनवणे यांनीही प्रत्युत्तर दिले होते.
अशा राजकीय परिस्थितीत आता मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनातील एक शिलेदार आणि जरांगे यांचे निकटवर्तीय गंगाधर काळकुटे यांनी आता बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र काळकुटे यांनी आपण जरांगेंची भेट घेणार असल्याचे सांगितले. जरांगे यांना भेटून उमेदवारी अर्ज दाखल करायचा की नाही, याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण (Marathi Reseravtion) लढ्यात सुरुवातीपासून असलेले बीडचे रहिवाशी गंगाधर काळकुटे यांनी बीड लोकसभेसाठी शड्डू ठोकला आहे. निवडणुकीसाठी शेवटच्या क्षणी अर्ज भरला आहे. बीडमध्ये मराठा आरक्षण हा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यामुळे पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे हे दोन्हीही नेते मराठा आरक्षणावर आपली भूमिका वेळोवेळी बोलून दाखवत आहेत. हाच मुद्दा लक्षात घेऊन आता गंगाधर काळकुटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याबाबत काळकुटे म्हणाले, मनोज जरांगे यांच्याशी लवकरच भेट घेऊचर्चा करणार आहे. उमेदवारी अर्ज कायम ठेवायचा की मागे घ्यायचा, याचा निर्णय घेतला जाईल."
गंगाधर काळकुटे हे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मराठा आरक्षण आंदोलनातील काळकुटे जवळचे सहकारी आहेत. त्यांनी उमेदवार जाहीर करणार नसल्याचे सांगितले होते. मात्र आता काळकुटे बीडमधून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने जरांगे पाटील काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.