Vyanktesh Munde: परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना 20 फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 20 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर न्यायालयाने मुंडे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. त्यामुळं नियमानुसार, त्यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई झाली. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी हे आदेश दिले.
लाच प्रकरणात लाचलुचपत विभागाला रंगेहाथ सापडल्यानं अंबाजोगाईच्या विशेष सत्र न्यायालयाने तहसीलदार मुंडे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली होती. त्यानंतर बीड जिल्हा कारागृहात त्यांची रवानगी झाली. पण नियमानुसार, सरकारी अपकारी अधिकारी हे 48 तासांपेक्षा अधिक काळ न्यायालयीन कोठडीत राहिल्यास त्यांच्यावर सक्तीनं निलंबनाची कारवाई करावी लागते. या नियमानुसार, ४८ तास तुरुंगात घालवल्यानंतर तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना निलंबित करण्यात आले. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी 13 मार्च रोजी हे आदेश काढले. या कालावधी त्यांचे मुख्यालय जालना जिल्हाधिकारी कार्यालय असेल आणि त्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय मुख्यालय सोडता येणार नाही, असे विभागीय आयुक्तांनी काढलेल्या कारवाईच्या आदेशात स्पष्ट केले आहे.
तहसीलदार व्यंकटेश मुंडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्यानंतर त्यांच्या नांदेड येथील घराचीही दोन दिवसांनी झाडाझडती घेण्यात आली होती. मुंडे यांच्या पत्नी व मुली नांदेड येथे वास्तव्यास होत्या. त्यांच्या घराची पथकाने तपासणी केली तेव्हा तेरा तोळे सोने, 55 हजार रुपये रोख रक्कम असे घबाड हाती लागले होते. व्यंकटेश मुंडे हे वादग्रस्त अधिकारी म्हणून ओळखले जातात.
तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी तक्रारदाराकडे प्रमाणपत्र देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. पण तडजोडीत 25 हजार रुपये देण्याचे ठरले. दरम्यान, तक्रारदाराने 20 हजार रुपये देण्याची तयारी दर्शवली आणि आपल्याकडं तहसीलदारानं लाच मागितल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार अर्जाद्वारे कळवली. त्यानंतर विभागात सापळा लावला त्यात तहसीलदार लाच घेताना जाळ्यात अडकला. त्यानंतर तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्याविरोधात परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करुन अटकही करण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.