Bharat Gogawale Sarkarnama
मराठवाडा

Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी भरत गोगावलेंचं आता तुळजाभवानी मातेला साकडं!

Raigad Guardian Minister post : रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा उद्यापर्यंत सुटायला पाहिजे, असं वाटतंय. पण, ते आता तुळजाभवानी आईच्या हातात आहे, हेही सांगायला गोगावले विसरले नाहीत.

Vijaykumar Dudhale

Tuljapur, 14 February : आमचं मागणं काय आहे. आम्हाला काय पाहिजे काही नाही, ते तुळजाभवानी मातेलाही माहिती आहे. जनतेच्या मनात जे आहे, तेच मागणं आम्ही मागितलं आहे. रायगडचं पालकमंत्रिपद मिळावं, अशी आमची, आमचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मतदारबांधवांची जी इच्छा आहे, ती पूर्ण व्हावी, असं साकडं आम्ही तुळजाभवानी मातेला घातलं आहे, असे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले.

रोहयो मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) हे आज लातूरच्या दौऱ्यावर गेले होते. तेथून परत येताना गोगावले यांनी तुळजापूरमध्ये तुळजाभवानीचे दर्शन घेतले आहे. त्यानंतर माध्यमांशी बोलताना गोगावले यांनी पालकमंत्रिपदाबाबत भाष्य केले आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदाची गोगावले यांची इच्छा अजूनही पूर्ण होऊ शकलेली नाही, ती खंत आज पुन्हा एकदा त्यांच्या बोलण्यात दिसून आली.

गोगावले म्हणाले, महायुतीचे सरकार (Mahayuti Government) राज्यात सत्तेवर आहे, आमच्या हातून चांगली कामं घडो. गोरगरिब, शेतकरी, कष्टकरी मंडळींना आणि राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेवावं, असं मागणं आम्ही देवीला घातलं आहे.

मागील महायुती सरकारमध्ये मी मंत्री नव्हतो, त्यामुळे मला पालकमंत्रिपद देण्याचा काही प्रश्न नव्हता. आमचे मंत्री उदय सामंत यांना पालकमंत्रिपदावर संधी दिली होती. आता मी राज्य सरकारमध्ये मंत्री आहे, त्यामुळे ते मला मिळावं, अशी आमची मागणी आहे, असेही त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.

रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा उद्यापर्यंत सुटायला पाहिजे, असं वाटतंय. पण, ते आता तुळजाभवानी आईच्या हातात आहे, हेही सांगायला गोगावले विसरले नाहीत. त्यावरून गोगावले यांच्या मनात रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी असलेला खंत दिसून येते. आता हा तिढा सुटणार कधी हा खरा प्रश्न आहे.

आदित्य ठाकरे आता सर्वच गोष्टींवर आक्षेप घेत आहेत. तुमचं मन साफ पाहिजे. आपल्या लोकांबाबत विश्वास ठेवायला हवा. तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा, असा सल्लाही गोगावले यांनी दिला.

‘ऑपरेश टायगर’ची माझ्यावरही जबाबदारी

‘ऑपरेश टायगर’ची माझ्यावरही जबाबदारी आहे. मी उपनेता, पदाधिकारी आणि आता मंत्री म्हणून काम करत आहे. त्यामुळे पक्षवाढीसाठी जी काही मंडळी पक्षात येऊ घातली आहे. त्यांना आम्ही पक्षप्रवेश देतोय. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज मोठमोठे पदाधिकारी आपल्याकडे येत आहेत. त्यांना कल्पना आहे की आम्ही काम करणारी मंडळी आहेत, त्यामुळे ते आमच्याकडे येत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT