MLA Santosh Danve News Sarkarnama
मराठवाडा

MLA Santosh Danve Ness : आमदार संतोष दानवे यांनी पशुधन विकास अधिकार्‍याला धमकावले! व्हायरल ऑडिओ क्लिपने खळबळ

BJP MLA Santosh Danve has been accused of threatening a veterinary officer, with the incident being captured in an audio clip that has now gone viral. : भोकरदन तालुक्यातील नांजा येथे पशुधन विकास अधिकारी म्हणून कार्यरत असणारे डॉ. योगेश शिवलाल आक्से यांच्याबाबत परिसरातील व गावातील शेतकऱ्यांनी आमदार संतोष दानवे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या.

Jagdish Pansare

तुषार पाटील

भोकरदन : भाजपाचे आमदार संतोष दानवे यांनी भोकरदन येथील पशु वैद्यकीय अधिकाऱ्याला फोनवरून धमकावल्याची ऑडिओ क्लिप आज समाज माध्यमांवर व्हायरल झाली आणि एकच खळबळ उडाली. यावरून दिवसभर गदारोळ सुरू होता, त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे? याची माहिती समोर आली.

भोकरदन तालुक्यातील नांजा येथे पशुधन विकास अधिकारी म्हणून कार्यरत असणारे डॉ. योगेश शिवलाल आक्से यांच्याबाबत परिसरातील व गावातील शेतकऱ्यांनी आमदार संतोष दानवे (Santosh Danve) यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. विशेष म्हणजे संबंधित अधिकाऱ्याला नांजा चे सरपंच व उपसरपंच जाब विचारण्यास गेले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे सांगितले जाते.

त्यानंतर नांजा येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी संबंधित प्रकरण आमदार संतोष दानवे यांच्या कानावर घातले. गरीब शेतकऱ्यांना पशुधन गोठ्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रमाणपत्रा साठी 500 ते 2000 रुपयापर्यंत पैसे घेत असल्याचा आरोप संबंधित शेतकऱ्यांनी दानवे यांच्याकडे तक्रार करतांना केला. (BJP) यामध्ये काही महिला शेतकरीही असल्याने संतोष दानवे यांनी या प्रकरणात मी लक्ष घालतो सांगून संबंधित अधिकाऱ्यास फोन केला.

संतोष दानवे यांनी डॉ. योगेश आक्से यांना फोन केला व शेतकऱ्यांशी जरा नीट बोलत जा, लोकांना ग्रॅण्टली घेऊ नका, म्हणत खडसावले. यावर आक्से यांनी 'मी काय बोललो? मी कोणाशी बोललो ? म्हणत दानवेंना उलट प्रश्न केला. मी त्यांना उद्या या असं सांगितलं आहे, असे उत्तर दिले. हा सगळा संवाद क्लिपमध्ये आहे. आक्से यांची भाषा आमदार संतोष दानवे यांना खटकली. समजावण्याचा प्रयत्न करत असतांना आक्से त्यांचे ऐकून न घेता 'तुम्ही लोकप्रतिनिधी आहात नीट बोला, तुम्ही नागरिक आहात मी नागरिक आहे' असे म्हणत वाद घातला.

यातून दोघांमधील वादावादी वाढत गेली. संतोष दानवे यांनी आक्से फायलींसाठी पैसे घेतात, खाजगी प्रॅक्टिस करतात, असा आरोप केला. यावर आक्से यांनी प्रूफ दाखवा म्हणत प्रत्युत्तर दिले. विशेष म्हणजे हा प्रकार शुक्रवारी (ता.28) रोजी घडल्याची माहिती आहे. त्याची ऑडिओ क्लिप आज समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आली.

मी फक्त शेतकऱ्यांशी नीट बोला म्हणालो..

या प्रकरणावर "सरकारनामा' प्रतिनिधीने आमदार संतोष दानवे यांच्याशी संपर्क साधला. लोकांच्या प्रश्नासाठी शासकीय कर्मचाऱ्यांना जाब विचारणे हे लोकप्रतिनिधीचे काम आहे. माझी जर तुम्ही पूर्ण रेकॉर्डिंग ऐकली असेल तर त्या अधिकाऱ्याला मी सुरुवातीपासून शेतकऱ्यांशी नीट बोलत जा ,लोकांचे वेळेवर काम करा असे वारंवार बजावून देखील तो मला प्रति प्रश्न करत होता. शेतकऱ्यांनी तर मला त्या अधिकाऱ्याचे रेट कार्डच दाखवले. धक्कादायक म्हणजे एका गरीब महिला शेतकऱ्याने मला तक्रार दिली होती.

त्या महिलेचे नाव उघडकीस येऊ नये व तिची बदनामी होऊ नये म्हणून मी हा विषय पूर्णपणे टाळला. माझ्या रेकॉर्डिंग मध्ये मी कुठेही महिलेचा उल्लेख केलेला नाही. याशिवाय तो गावच्या सरपंच व उपसरपंच यांना देखील जुमानत नव्हता. अशा अधिकाऱ्यांना कडक भाषेत समज देण्याशिवाय पर्याय नसतो. अधिकारी व लोकप्रतिनिधी दोन्ही जनतेसाठीच काम करत असतात पैसे घेण्यासाठी नव्हे. गाव पातळीवर प्रत्येक शेतकऱ्याला छोट्या कागदासाठी पैसे मागणाऱ्या अधिकाऱ्याला सभ्य भाषेत बोलायचे का?, असा प्रतिप्रश्न संतोष दानवे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT