Pramod Rathore
Pramod Rathore Sarkarnama
मराठवाडा

BJP Spokesperson : भाजपचे नवे प्रवक्ते सायकलवर फिरून लढवणार पक्षाची खिंड

Tushar Patil

Chhatrapati Sambhajinagar, 09 May : एक दोन नव्हे; तर गेली दशकभर सलग सत्तेच्या राजकारणात राहणाऱ्या भारतीय जनता पक्षामध्ये गेल्या काही काळामध्ये प्रचंड बदल झाले. सत्तेच्या माध्यमातून पक्षविस्तार झाला. पक्षाची आलिशान कार्यालय उभी राहिली आणि त्यातूनही सत्ता विस्ताराचे अनेक प्रयोग राबविले गेले. पण, या सत्तेच्या दरबारात राहिलेले छत्रपती संभाजीनगरमधील भाजपचे एक नेते आता पक्षाची बाजू मांडण्यासाठी चक्क सायकलवर फिरणार आहेत, हे ऐकून तुम्हाला थोडसं नवल, आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे .

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील प्रमोद राठोड (Pramod Rathore) हे नगरसेवक असून गेली अनेक वर्षे छत्रपती संभाजीनगर महापालिकेत विरोधी पक्षनेता, उपमहापौर, 2015 ते 2020 स्मार्ट सिटी प्रोजेक्टचे संचालक, यांसह विविध पदांवर राहिलेले प्रमोद राठोड आता भाजपचे (BJP) प्रदेश प्रवक्ते झाले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आठवड्यातून एक दिवस छत्रपती संभाजीनगरमध्ये सायकलवरून फेरी मारणारे राठोड प्रवक्तेपदाच्या खुर्चीत बसल्यानंतरही सायकलवर फिरूनच पक्षाची बाजू मांडणार आहेत, त्यामुळे त्यांच्या या नव्या भूमिकेची, निर्णयाची चर्चा छत्रपती संभाजी नगरच्या आणि राज्याच्या राजकारणात होणार हे नक्की.

उपमहापौरपदाच्या कार्यकाळात पर्यावरणाचा समतोल राखत फिटनेसची जोड असावी, या उद्देशाने आवड म्हणून त्यांनी एक दिवस सायकलवर फिरण्याचा संकल्प केला आणि ते कमालीचे फेमस झाले. जालन्याचे खासदार आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या संपर्कात आले आणि त्यांचे विश्वासू बनले.

गेल्या दहा वर्षात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रथम वर्ग शिबिर तसेच पक्षाच्या संघटनात्मक विविध बाबींवर काम केले आहे. रावसाहेब दानवे व अतुल सावे यांच्या यांच्या निवडणुकांमध्ये त्यांनी प्रचारात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. राणे-दानवे यांचे विश्वासू अशी ओळख असलेल्या राठोड यांच्या संघटनात्मक कामाची दखल घेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राठोड यांच्यावर प्रदेश प्रवक्ते म्हणून जबाबदारी सोपवली आहे. या नियुक्तीचे पत्र राठोड यांना नुकतेच रावसाहेब दानवे यांच्या हस्ते देण्यात आले.

बढती मिळाल्यानंतर देखील ते आपल्या या मूळ संकल्पनेनुसारच एक दिवस सायकलवर फिरून प्रवक्तेपदाची धुरा सांभाळणार आहेत. पक्षाच्या कार्यक्रमासाठी बैठका, कॉर्नर मिटिंग, प्रचार रॅली यादेखील ते सायकलवर काढणार आहे. राठोड हे आता नव्या उत्साहाने कामाला लागलेले आहेत. मात्र, त्यातही त्यांनी काम करताना आपली एक दिवस सायकलवर फिरण्याची स्टाईल कायम ठेवण्याचा निश्चय केलेला आहे व त्या दृष्टीने त्यांच्या कामाचा धडाका असणार आहे.

भाजपसारख्या टेक्नोसेव्ही आणि नवनवीन कल्पनांना प्राधान्य देणाऱ्या पक्षात राठोड यांची ही अनोखी कल्पना पक्षाला व त्यांना किती फायदेशीर ठरेल, हेही आगामी काळात बघावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT