Ambad Tehsildar Vijay Chavan 
मराठवाडा

Ambad Tehsildar: वाळू उपसा चालू ठेवण्यासाठी मागितली साडे सहा लाखांची लाच! अंबडच्या तहसीलदाराला रंगेहात पकडलं

मराठवाड्यात लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईने सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना धडकी भरली आहे.

Jagdish Pansare

Ambad Tahsildar Bribe Case : मराठवाड्यात लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईने सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना धडकी भरली आहे. जालना-बीडमध्ये एकाच दिवशी कारवाई करत एसीबीने एक पोलीस अंमलदार अन् दुसऱ्या कारवाईत थेट तहसीलदारालाच अटक केली. या दोन धडक कारवायांमुळे प्रशासनाला धडकी भरली आहे. अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांना एका प्रकरणात ६ लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना बीडच्या पथकाने अटक केली.

जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बीडमध्ये कारवाई केल्यानंतर बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जालना जिल्ह्यात मोठी कारवाई केल्याचे समोर आले आहे. अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील राहत्या घरी सापळा रचून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

अंबड तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातील वाळू उत्खननासाठी पोकलेन व ट्रक सुरू ठेवण्याच्या मोबदल्यात ही लाचेची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. एसीबीने लाचेची रक्कम तब्बल ६ लाख ४० हजार रुपये स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण जेरबंद केले. याप्रकरणी, छत्रपती संभाजीनगरच्या सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दहा हजारांची लाच घेताना अंमलदार अडकला

बीड जिल्ह्यातील नेकनूर पोलीस स्टेशनमधील अंमलदार दत्तात्र्य बळवंत याला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने दहा हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले. अपघातामध्ये मयत झालेल्या वडिलांच्या विम्याच्या दाव्यासाठी कागदपत्र देण्यासाठी बळवंत याने पंधरा हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर दहा हजार रुपये स्वीकारताना या पोलीस अंमलदाराला जालना अँटी करप्शनच्या पथकाने पकडले आहे. याच वादग्रस्त दत्तात्रय बळवंत याने एका शेतकऱ्याच्या मुलाला 'तुझे कॅरेक्टर खराब करून टाकीन' अशी धमकी काही दिवसापूर्वी दिली होती. या घटनेचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT