Abhijeet Dipke: आईची एक आठवण सांगत अभिजीत दिपकेचा थेट मोदी सरकारवर निशाणा; म्हणाला, देशभरात...

Abhijeet Dipke: कॉक्रोच जनता पार्टीचं आज दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर सरकारविरोधात निषेध आंदोलन पार पडलं. यावेळी शिक्षण क्षेत्रातील अनागोंदी कारभारासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करण्यात आली.
Narendra Modi_Abhijeet Dipke
Narendra Modi_Abhijeet Dipke
Published on
Updated on

Abhijeet Dipke: कॉक्रोच जनता पार्टीचं आज दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर सरकारविरोधात निषेध आंदोलन पार पडलं. यावेळी शिक्षण क्षेत्रातील अनागोंदी कारभारासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करण्यात आली. यावेळी या चळवळीचा आणि आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेल्या अभिजीत दिपके या मराठी तरुणानं थेट मोदी सरकारवर हल्लाबोल केला. तुमचं भीतीचं राजकारण आता चालणार नाही, असं त्यानं ठणकावून सांगितलं. हे सांगताना त्यानं आपल्या आईची एक आठवण सांगितली. यावेळी त्याला उपस्थितीत तरुणांनी मोठा पाठिंबा दर्शवला.

Narendra Modi_Abhijeet Dipke
Uddhav Thackeray: ....कमी समजू नका! उद्धव ठाकरेंचा दिल्लीतल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावरुन सरकारला इशारा

अभिजीत दिपकेनं सांगितलं की, "मी अमेरिकेला निघालो तेव्हा माझ्या आईला काही प्रमाणात अश्रू अनावर झाले होते, तिला वाटत होतं की माझा मुलगा चाललाय तिथं त्याच्यासोबत कोण असेल? तिला काळजी वाटणं हे मी समजू शकतो कारण आपला मुलगा दुसऱ्या देशात चालला असल्यानं तिला असं वाटणं सहाजिक आहे. पण मी ज्यावेळी भारतातून अमेरिकेला चाललो होतो तेव्हा माझी आई जितकी रडली नाही तितकी ती मी पुन्हा मी घरी परत येणार असल्याचं कळताच रडत होती"

Narendra Modi_Abhijeet Dipke
GenZचा दिल्लीत एल्गार! कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात तरुणांनी काय मांडले मुद्दे; पाहा फोटो

"गेल्या दोन-तीन दिवसांपासून माझी आणि माझी बहीण हे रडत होते, मला म्हणत होते की तू जर परत भारतात आलास तर हे लोक तुला तुरुंगात टाकतील. मी माझ्या घऱी परतत असताना देखील त्यांना भीती वाटत होती. पण ही भीती माझ्या आईची एकटीची भीती नाहीए, तर या देशात जो मुलगा, जो विद्यार्थी, जो तरुण राजकारणावर बोलेल किंवा सरकारविरोधात बोलेल तर त्याच्या आईला याची भीती वाटते की, हे माझ्या मुलाला तुरुंगात तर टाकणार नाहीत ना. जोपर्यंत आपण अशा प्रकारे भीतीच्या सावटाखाली राहू हे होतच राहणार आहे. त्यामुळं आता आपल्याला यांना हे सांगायचं आहे की, यांच्या भीतीच्या राजकारणाला आम्ही घाबरणार नाही" यावेळी उपस्थित तरुणांकडून उस्फुर्तपणे घोषणाबाजी झाली, "नही डरेंगे नही डरेंगे! तुम्हारी डर की राजनीती से अब नही डरेंगे"

दरम्यान, कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील या आंदोलनाला आज सकाळी १० ते ५ या वेळेसाठी परवानगी देण्यात आली होती. त्यामुळं संध्याकाळी ५ वाजल्यानंतर हे आंदोलन आता समाप्त झालं असून अभिजीत दिपके आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी आलेले लडाखचे पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक हे दोघेही आता आंदोलनस्थळावरुन निघून गेले आहेत. त्याचबरोबर इथं जमा झालेले तरुणही आता आंदोलन समाप्त झाल्यानं पुन्हा घराकडे परतले आहेत. पण अगदी शांततेत कोणताही हिंसाचार किंवा गडबड न होता हे आंदोलन पार पडलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com