Saurav Ganguly: सौरव गांगुलीनं युसुफ पठाणला तृणमूलची खासदारकी सोडायला सांगितली? चर्चांना उधाण; स्वतःच केला खुलासा

Saurav Ganguly: पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा मोठा पराभव झाला.
Mamata Banerjee_Saurav Ganguly
Mamata Banerjee_Saurav Ganguly
Published on
Updated on

Saurav Ganguly And Yusuf Pathan: पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा मोठा पराभव झाला. त्यानतंर बऱ्याच राजकीय उलथापालथी झाल्या, त्या अजूनही सुरुच आहेत. यात आता आणखी एक खळबळजनक बातमीची चर्चा सुरु आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार असलेले माजी क्रिकेटर युसुफ पठाण यांचा राजीनामा घेणार असल्याची चर्चा आहे. यासाठी टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीकडून प्रयत्न सुरु असल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे गांगुलीनं या चर्चांवर स्वतःहून स्पष्टीकरण दिलं आहे.

Mamata Banerjee_Saurav Ganguly
Abhijeet Dipke: आईची एक आठवण सांगत अभिजीत दिपकेचा थेट मोदी सरकारवर निशाणा; म्हणाला, देशभरात...

नेमका विषय काय?

बंगालच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे मुख्यमंत्री राहिलेल्या ममता बॅनर्जी यांचा या निवडणुकीत पराभव झाला. तसंच आता त्यांचा पक्षही फुटल्यानं ममतांना आणखी मोठा झटका बसला आहे. त्यातच त्यांचे २३ खासदारही बंडखोर नेते आणि बंगालचे विरोधीपक्ष नेते निवडले गेलेले ऋतब्रता बॅनर्जी यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. यापार्श्वभूमीवर आपलं राजकीय महत्व कमी झाल्यानं आता ममता बॅनर्जी यांनी थेट लोकसभेत जाण्याची तयारी सुरु केली आहे. यासाठी पोटनिवडणूक घडवून आणून तिथून संसदेत एन्ट्री करुन खासदार होण्याची त्यांची मनिषा आहे. एका लोकप्रिय बंगाली वृत्तपत्रात छापून आलेल्या लेखामध्ये असा दावा करण्यात आला आहे, त्यामुळं याची देशभरात चर्चा सुरु झाली आहे.

Mamata Banerjee_Saurav Ganguly
Uddhav Thackeray: ....कमी समजू नका! उद्धव ठाकरेंचा दिल्लीतल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावरुन सरकारला इशारा

यासाठी ममतांची नजर मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बहरामपूर या जागेवर आहे. या जागेवरुन तृणमूल काँग्रेसकडून माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण हे खासदार म्हणून निवडून आले आहेत. २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांचा त्यांनी पराभव केला. पठाण हे एक जायंट किलर ठरले होते. ही जागा आपल्याला निवडून येण्यासाठी सुरक्षित असल्याचं ममतांचं म्हणणं आहे. कारण या मतदारसंघात मुस्लीम मतदार हे ५० ते ५२ टक्के आहेत. त्यामुळं ते पोटनिवडणूक झाल्यास आपल्या पाठीशी उभे राहतील असा ममता बॅनर्जींना विश्वास असल्याचंही या लेखात म्हटलं आहे.

याच कारणासाठी ममता बॅनर्जींनी या जागेवरुन राजीनामा देण्याचा निरोप हा सौरव गांगुली यांच्यामार्फत युसूफ पठाण यांना देण्यासाठी संपर्क साधला होता. युसुफ पठाण आणि सौरव गांगुली हे दोघे आयपीएलच्या कोलकाता नाईट रायडर या संघात एकत्र खेळले होते, त्यामुळं त्यांच्यामध्ये परस्पर मैत्रीचे संबंध असल्यानं पठाण यांच्याकडून जागा सोडण्यासाठी मंजुरी मिळेल अशी आशा तृणमूल काँग्रेसला होती. पण युसुफ पठाण यांनी आपली खासदारकी सोडण्यास नकार दिल्याचंही कळतंय. त्यामुळं आता ममता बॅनर्जी यांची चांगलीच अडचण झाली आहे, असंही लेखात म्हटलं आहे.

Mamata Banerjee_Saurav Ganguly
GenZचा दिल्लीत एल्गार! कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात तरुणांनी काय मांडले मुद्दे; पाहा फोटो

दरम्यान, युसुफ पठाण यांना आपण असा कुठलाही निरोप दिलेला नसल्याचं सौरव गांगुली यांनी एका पत्राद्वारे स्पष्ट केलं आहे. या पत्रात गांगुली म्हणतात, "हा दावा 'पूर्णपणे खोटा' आहे. आपला राजकीय बाबींशी कधीही संबंध आलेला नाही. तसंच, अशा खळबळजनक बातम्या प्रकाशीत करण्यापूर्वी प्रसारमाध्यमांनी त्यातील तथ्यांची खातरजमा करावी. वर्तमानपत्राच्या लेखात माझ्याशी संबंधित जे आरोप करण्यात आले आहेत, ते खोटे आहेत. ममता बॅनर्जी यांनी आपल्याकडं युसुफ पठाण यांना निरोप देण्याची विनंती कधीही केली नव्हती. त्यामुळं विषयाबाबत पठाण यांच्याशी आपण कधीही संपर्क साधला नसल्याचं वृत्तही सौरव गांगुली यांनी फेटाळून लावलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com