Kailas gorntyal, Arjun Khotkar News Jalna Sarkarnama
मराठवाडा

Kailas Gorantyal Allegation News : अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द करून गुन्हा दाखल करा! काँग्रेसच्या गोरंट्याल यांची मागणी

Congress ex-MLA Kailas Gorantyal has demanded the cancellation of Shiv Sena MLA Arjun Khotkar's membership and the filing of a criminal case against him. :अर्जुन खोतकर यांच्या पीएने त्यांच्या सांगण्यावरूनच रक्कम गोळा केल्याचा आरोप गोरंट्याल यांनी केला. त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करून गुन्हे दाखल करावेत.

Jagdish Pansare

Jalan Political News : जालन्याचे आमदार तथा विधिमंडळ अंदाज समितीचे प्रमुख अर्जुन खोतकर यांच्या अडचणीत भर पडताना दिसते आहे. धुळे येथील शासकीय विश्रामगृहातील 102 नंबरच्या खोलीतून पावणे दोन कोटीची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही रक्कम अर्जुन खोतकर यांच्या पीएने अधिकारी, कंत्राटदार यांच्याकडून गोळा केली होती, असा आरोप माजी आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल गोटे यांनी केला. यावरून जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली.

अर्जुन खोतकर यांच्या पीएने त्यांच्या सांगण्यावरूनच रक्कम गोळा केल्याचा आरोप गोरंट्याल (Kailas Gorantyal) यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यामुळे खोतकर यांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी गोरंट्याल यांनी केली. जालना विधानसभा मतदारसंघात आपला पराभव झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात जमीनी बळकावण्याचे, शासकीय जागा हडपण्याचे प्रकार सुरू झाल्याचा गंभीर आरोपही गोरंट्याल यांनी केला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वच्छ, पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त कारभाराची ग्वाही जनतेला दिली आहे.

अंदाज समितीच्या कामात आता भ्रष्टाचार होणार नाही, असा दावा नुकताच मुख्यमंत्र्यांनी केला होता. मग धुळे (Dhule) येथे शासकीय विश्रामगृहात जे पाच कोटी रुपये सापडले, त्याचे काय? असा सवालही गोरंट्याल यांनी केला. अनिल गोटे यांनी हा भ्रष्टाचार उघडकीस आणला त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो. परंतु सत्तेच्या जोरावर हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे.

कुठल्याही परिस्थितीत अंदाज समितीचे अध्यक्ष असलेल्या अर्जुन खोतकर यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे, याचा पुनरुच्चार गोरंट्याल यांनी केला. विधानसभा निवडणुकीतील आपल्या पराभवानंतर जालन्यामध्ये गैर प्रकार आणि मालमत्ता हडपण्याचे प्रकार कसे सुरू झाले आहेत, याची माहिती आपण पुराव्यासहित लवकरच पत्रकार परिषद घेऊन देणार असल्याचे गोरंट्याल यांनी सांगितले.

तसेच अर्जुन खोतकर यांच्यावर कारवाईसाठी आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊ, असेही ते म्हणाले. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार आणि विधिमंडळ अंदाज समितीचे प्रमुख अर्जुन खोतकर धुळे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांच्या स्वीय सहाय्यकाच्या खोलीमध्ये पाच कोटी रुपये आढळले. अनिल गोटे यांनी हा प्रकार उघडकीस आणला. त्यामुळे राज्यभर एकच खळबळ उडाली आहे.

अर्जुन खोतकर यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. असा कुठलाही प्रकार घडलेला नाही, हे कोणी प्लाँट केले होते का? याचा तपास करावा लागेल, असे खोतकर यांनी म्हटले आहे. दरम्यान, गोरंट्याल यांनी केलेल्या मागणीवर खोतकर काय उत्तर देतात? याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT