Ramdas Athawale, Sharad Pawar sarkarnama
मराठवाडा

Ramdas Athawale News : आमच्यासोबत नारी, तुमची कशी वाजेल तुतारी...! आठवलेंची पवारांच्या राष्ट्रवादीवर टीका

Ramdas Athawale रामदास आठवले यांनी सांगितले की, शिर्डी आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात आरपीआय आठवले पक्ष स्वतःच्या चिन्हावर लढणार आहे.

Shital Waghmare

Ramdas Athawale News : 'राष्ट्रवादीने करावी आता पंढरपूरची वारी, कारण त्यांना मिळाली आहे तुतारी. गावागावातली आहे आमच्यासोबत नारी, तुमची कशी वाजेल तुतारी..' या आपल्या खास कवितेतून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शरद पवारांच्या पक्षाला मिळालेल्या तुतारी चिन्हावरून खोचक शुभेच्छा दिल्या आहेत.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, विविध कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमानंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसला तुतारी चिन्ह मिळाले आहे, याबद्दल तुम्ही काही कविता केली आहे का, असे विचारले असता त्यांनी कविता सादर केली.

आठवले म्हणाले, राष्ट्रवादीने करावी आता पंढरपूरची वारी, कारण त्यांना मिळाली आहे तुतारी. गावागावातली आहे आमच्यासोबत नारी, तुमची कशी वाजेल तुतारी... या आपल्या खास कवितेतून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शरद पवारांच्या पक्षाला मिळालेल्या तुतारी चिन्हावरून खोचक टीका करत शुभेच्छा दिल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शरद पवारांना एनडीएमध्ये घेणार का, आलेच तर त्यांना कोणते पद देणार, या प्रश्नावर आठवले म्हणाले, शरद पवार आले तर आम्ही त्यांना घेऊ, पण आले नाहीत तर त्यांना काय द्यायचा प्रश्नच उद्भवत नाही. पण, आमच्याकडे अनेक नेते मंडळी आहेत, त्यामुळे पवारांनी यावे असे काही नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

रामदास आठवले यांनी सांगितले की, शिर्डी आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघांत आरपीआय आठवले पक्ष स्वतःच्या चिन्हावर लढणार आहे. कमळाच्या चिन्हावर लढण्याचं प्रश्नच उद्भवत नाही. तिन्ही वेळा स्वतंत्र लढलो, तर याही वेळेस स्वतंत्र लढणार, असे रामदास आठवले यांनी चिन्हाबाबत स्पष्ट केले आहे.

Edited By : Umesh Bambare

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT