Shivsena UBT News : बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कुठे अन् उद्धव ठाकरेंचा पक्ष कुठे? हा पक्ष पुढील विधानसभा निवडणुकीत दिसणार नाही, अशी टीका भाजपाचे नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भाजपा स्थापनादिनाच्या आपल्या भाषणातून केली होती. यावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर पलटवार करत 2019 च्या लोकसभा निवडणुकीत युती असताना माझ्याविरोधात पैसे वाटणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, अशा शब्दांत फटकारले.
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या (Shivsena UBT) लोकसभा अन् राज्यसभेतील खासदारांनी मतदान केले. त्यानंतर संतापलेल्या भाजपाच्या राज्यातील नेत्यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षावर टीकेची झोड उठवली आहे. भाजपाच्या स्थापनादिनाच्या कार्यक्रमात रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या भाषणात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर तोफ डागली.
काँग्रेस, राष्ट्रवादीची राज्यात चांगली ताकद होती. परंतु त्यांच्या वागण्या, बोलण्या आणि विचारापासून दूर जाण्याने हे पक्ष संपत आले आहेत. उद्धव ठाकरे यांची शिवसेना तर पुढील विधानसभा निवडणुकीत दिसणारच नाही, अशी टीका दानवे यांनी केली होती. शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Kahire) यांनी यावरून रावसाहेब दानवे यांना सुनावले. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाची युती होती. युती असताना दानवे यांनी हाॅस्पीटलमधून माझ्याविरोधात काम केले.
आमच्या पक्षाच्या अनेक नगरसेवक आणि एका नेत्याला पैसे वाटले आणि माझा पराभव घडवून आणला. तेव्हा कुठे गेला होता तुमचा प्रामाणिकपणा? तेव्हापासून मी रावसाहेब दानवे यांचे तोंडही पाहिले नाही. भाजपामध्ये एक पक्ष एक पद असं सांगितलं जातं. पण रावसाहेब दानवे यांच्या घरात त्यांच्या दोन्ही मुलांना पक्षाने तिकीट दिले. मुलगी संजना जाधव आणि चिरंजीव संतोष दानवे एकाच घरातले बहीण-भाऊ आमदार आहेत. जालना जिल्ह्यातील रस्त्याची सगळी कंत्राट यांच्या भावाकडे आहेत.
सिल्लोड ते अजिंठा, पैठण रस्त्याचे काम वर्षानूवर्ष रखडले ते रावसाहेब दानवे यांच्यामुळेच, असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला. कन्नडमध्ये पक्षाच्या विरोधात काम केल्यामुळे मी तेव्हा जिल्हा परिषदेला संजना जाधव यांचा पराभव केला होता. आता एकनाथ शिंदेंच्या कृपेने रावसाहेब दानवे यांनी त्यांना आमदार केले. युती असताना माझ्या पराभवासाठी पैसे वाटणाऱ्या रावसाहेब दानवे यांनी आम्हाला शिकवू नये, असा संपातही खैरे यांनी व्यक्त केला.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.