Chandrakant Khaire Sarkarnama
मराठवाडा

BJP vs Shiv Sena politics : 'काहीही म्हणा, देवेंद्रजींना वाटतंय की, दोन्ही भाऊ एकत्र येऊ नये'; चंद्रकांत खैरेंनी टायमिंग साधलं

Chhatrapati Sambhajinagar Shiv SenaUBT Chandrakant Khaire Slams Devendra Fadnavis at Shiv Sena Thackeray Faction Rally in Mumbai : मुंबईत उद्या होत असलेल्या विजय मेळाव्याच्या तोंडावर चंद्रकांत खैरे यांनी भाजप सीएम देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

Pradeep Pendhare

Chandrakant Khaire criticism Devendra Fadnavis : राज्यातील भाजप महायुती सरकारला ठाकरे बंधूंनी दिलेल्या दणक्यानंतर हिंदी सक्तीचा अध्यादेश रद्द करावा लागला. उद्या मुंबईत ठाकरे बंधूंचा विजय मेळावा आहे. त्याची जोरात तयारी सुरू आहे.

या विजय मेळाव्यानिमित्ताने दोन्ही ठाकरे बंधूंच्या कार्यकर्त्यांमध्ये शंभर हत्तीचं बळ संचारलं आहे. छत्रपती संभाजीनगरमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी टायमिंग साधत, भाजप सीएम देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. चंद्रकांत खैरे यांनी साधलेलं टायमिंग मात्र चर्चेत आलं आहे.

चंद्रकांत खैरे यांनी एका वाक्यात भाजप (BJP) सीएम देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठाकरे बंधू यांच्या एकत्र येण्यावरून निशाणा साधला. 'भाजप किंवा देवेंद्र फडणवीस यांना वाटत होते की, दोघे भाऊ एकत्र येऊ नये. ठाकरे ब्रँड आता राहणार आहे, आणि ते दिसतो. राज ठाकरे बाहेर पडले, तेव्हा आम्हाला दुःख झाले. पण आता आनंद होत आहे की, ते दोघे एकत्र येत आहेत. राज ठाकरे सोडून गेले, तरी बाळासाहेब ठाकरे यांचे त्यांच्यावर प्रेम होते', असेही चंद्रकांत खैरे यांनी म्हटले.

मी 'मातोश्री'चा सैनिक आहे. सर्वांना आनंद झाला आहे की, दोन्ही भाऊ एकत्र यावे, ही मराठी माणसाची इच्छा आहे. आज महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार अन् भांडणे सुरू आहेत, दोन्ही भाऊ एकत्र आले, तर आनंद होईल. मी शिवसेनेत (Shivsena) आमदार, खासदार आणि मंत्री झालो, या दोघांसोबत काम केल्याचे चंद्रकांत खैरे यांनी म्हटले.

हिंदीला विरोध नाही, पण हिंदी लादू नये. पण दोन्ही भावांचा याला विरोध होता. सरकारने खोटा आदेश काढला, तो रद्द झाला म्हणून हा विजय मेळावा होत आहे. हा विजय मेळावा राज्याच्या राजकारणात ऐतिहासिक ठरेल, असे देखील चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे.

मंत्री सामंत, मंत्री राणेंवर टीका

चंद्रकांत खैरे यांनी शिवेसनेचे मंत्री उदय सामंत यांच्यावर टीका करताना हा कचरा माणूस आहे, असे म्हटले. तर भाजप मंत्री नितेश राणे यांच्यावर देखील खैरे यांनी टीका केली. मुंबईमध्ये उद्या जबरदस्त वातावरण राहणार आहे. मनसे, शिवसेना आणि इतर मराठी जनता येणार आहे. मी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना धन्यवाद देतो त्यांनी चांगली भूमिका घेतली. मग नाऱ्या बिऱ्या ज्या टीका करतात ते करू द्या, शेवटी काही जरी झाले तरी दोन्ही भाऊ एकत्र येत आहेत, असा टोला चंद्रकांत खैरे यांनी लगावला.

चहा प्या, समोसा घ्या, तुम्ही पनीर खा...

'देवेंद्र फडणवीस यांनी चहा प्या, समोसा घ्या, तुम्ही पनीर खा, तुम्ही व्यायाम करा, तुम्ही सेव्हिंग करा, असे बोलतात. पण आतून त्यांना वाटते हे दोघे भाऊ एकत्र येऊ नये, आणि हे सर्व दुनियेला माहित आहे. फडवणीस वरतून बोलतात, असा टोला खैरेंनी लगावला. पण काही टिन पाट लोक बोलतात, असे होऊ शकत नाही, त्यांना वाटते हे दोघे एकत्र आले, तर आपले काय होईल, आणि या भीतीने ते लोक बोलतात', असेही देखील चंद्रकांत खैरे यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT