Harshvardhan Jadhav Sarkarnama
मराठवाडा

Chhatrapati Sambhajinagar Constituency: मराठ्यांनो...वज्रमूठ बांधा, निवडणूक ताब्यात घ्या, हीच श्रींची इच्छा!

Loksabha Election 2024 : 'माझ्याकडे पैसा नाही, मी गरीब पण सच्चा माणूस आहे, मला पाठबळ द्या...'

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News : वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्नशील असलेल्या हर्षवर्धन जाधव यांना ती नाकारण्यात आली. प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्याविरोधात अफसर खान यांना उमेदवारी देत मुस्लिम मतांच्या विभाजनाचा डाव टाकला. त्यामुळे इम्तियाज जलील यांना गेल्या निवडणुकीत मिळालेली 3 लाख 89 हजार मते दोन भागात विभागली जातील, तर शिवसेनेत पडलेली फूट, भाजपसोबत नसल्यामुळे ठाकरे गटाच्या खैरेंच्या मतांमध्ये तीन भाग पडणार आहेत, असा दावा हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे.

या उलट 2019 मध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मला मिळालेली 2 लाख 83 हजार मते कायम आहेत. मराठ्यांनी पुन्हा एकदा वज्रमूठ बांधत ही निवडणूक हातात घेतली तर आपला विजय निश्चित होऊ शकतो. ही निवडणूक मराठ्यांनी हातात घ्यावी ही श्रींची इच्छा असल्याचे सांगत माझ्यासारख्या गरीब पण सच्चा माणसाला साथ द्या, असे आवाहनही हर्षवर्धन जाधव यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.

मराठा आरक्षणाचा प्रश्न संसदेत जाऊन सोडवायचा असले तर मराठा समाजाला पुन्हा एकदा एकजूट होऊन वज्रमुठीची ताकद दाखवावी लागेल. वंचितने अफसर खान यांना उमेदवारी दिल्याने इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांचा गेम संपला आहे. गेल्यावेळी वंचित आघाडीसोबत असल्यामुळे इम्तियाज निवडून आले होते.

आता वंचित सोबत नाही आणि दुसरीकडे मुस्लिम उमेदवार दिल्याने इम्तियाज यांच्या मतांचे दोन भाग होणार आहेत, अशावेळी मला मिळालेली आणि कायम असलेली मते या निवडणुकीत मेहनत घेतली तर निश्चितच आपल्याला विजय मिळवून देऊ शकतात.

चंद्रकांत खैरे यांची परिस्थिती अवघड आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती होती. आता शिवसेनेचे दोन गट पडले आहेत, शिवाय भाजपही सोबत नाही. त्यामुळे खैरे यांच्याकडे त्यांची काही मते कायम असली तरी निवडून येण्यासाठी ती पुरेसी नाहीत. महाविकास आघाडीमुळे काँग्रेसची मते त्यांच्याशी जोडली तरी काँग्रेसला गेल्यावेळी मतदान करणारे मुस्लिम मतदार खैरेंना मदत करण्याची शक्यता नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अशावेळी मराठा आरक्षणासाठी मराठ्यांनी एकत्र येणं काळाजी गरज आहे. गेल्यावेळच्या मतांमध्ये आपण ताकदीने काम करून वाढ करू शकलो, तर आपला विजय निश्चित होऊ शकतो. असे झाले तर संसदेत मराठा आरक्षणाचा प्रश्न आपण सोडवू शकू. माझ्याकडे पैसा नाही, मी गरीब पण सच्चा माणूस आहे, मला पाठबळ द्या, असे आवाहनही हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांनी केले. येत्या 9 एप्रिल रोजी जाधव हे आपल्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करणार आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT