Imtiaz Jalil on Khaire News : चंद्रकांत खैरेंच्या उमेदवारीचे इम्तियाज जलील यांच्याकडून स्वागत, मात्र दिला 'हा' सल्ला!

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Constituency : ठाकरे गटाकडून छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासाठी चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
Imtiaz Jaleel on Khaire News
Imtiaz Jaleel on Khaire NewsSarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election 2024 : शिवसेना ठाकरे गटाने छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आतापर्यंत संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे आणि एमआयएमच्या इम्तियाज जलील यांच्याच उमेदवारीची अधिकृत घोषणा झाली आहे. 2019 च्या निवडणुकीत या दोन स्पर्धकांमध्ये काटे की टक्कर झाली होती. खैरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर इम्तियाज जलील यांनी माध्यमांकडे प्रतिक्रिया देताना माझे मित्र असा त्यांचा उल्लेख करत अभिनंदन केले आणि शुभेच्छाही दिल्या.

सोबतच येणारी निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर, जिल्ह्याला प्रगतीकडे नेण्यासाठी काय केले पाहिजे यावर विचारमंथन, अशा विषयावर लढवण्याचा सल्लाही दिला. पण जर पुन्हा तुम्ही हिंदू-मुसलमान, खान पाहिजे की बाण हेच मुद्दे घेऊन लढणार असाल तर मात्र तुमच्यावर पश्चातापाची वेळ येईल, असा टोलाही लगावला. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटातील दोन नेत्यांमध्ये स्पर्धा होती. त्यांच्यातील वादावादी चव्हाट्यावर आली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यानंतर अखेर आज चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी जाहीर झाली. ही उमेदवारी जाहीर होताच पुन्हा एकदा 2019 मध्ये एकमेकांविरुद्ध लढलेले खैरे-इम्तियाज आमने-सामने आले आहेत. साहजिकच एक स्पर्धक म्हणून इम्तियाज यांना काय वाटते? हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांना होती. इम्तियाज जलील यांनीही खैरे यांना उमेदवारीच्या शुभेच्छा देत जातीय राजकारण न करता विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवण्याचा सल्लाही दिला.

कोणाला निवडून द्यायचे, कोणाचा पराभव करायचा हे जनता ठरवेलच. आपण मात्र शुद्ध राजकारण करू, जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र येऊन चांगल्या विषयांची देवाण-घेवाण करू, असेही इम्तियाज म्हणाले. तर दुसरीकडे खैरे यांनी मात्र इम्तियाज जलील यांचे स्पर्धक म्हणून आव्हान वाटते का? या प्रश्नावर त्यांना आता मोजायचे नाही, असे म्हणत गेल्यावेळी झालेली चूक मतदार करणार नाहीत, असे सांगत आता लढू आणि जिंकू, असा दावा केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Imtiaz Jaleel on Khaire News
Ambadas Danve News: खैरेंना उमेदवारी जाहीर, दानवे म्हणाले, "आम्हाला हट्ट करण्याचा अधिकार..."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com