Chhatrapati Sambhajinagar : महापालिका निवडणुका जाहीर होऊन उमेदवारी अर्ज वाटप आणि दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आज तीन दिवस झाले तरी मोठ्या पक्षांमध्ये सुरू असलेले युती-आघाडीची बोलणी काही निर्णयापर्यंत पोहचत नाहीये. दुसरीकडे एमआयएम, बहुजन समाज पक्षासारख्या पक्षांनी मात्र आपल्या उमेदवारांच्या पहिल्या याद्या जाहीर करत आघाडी घेतली आहे.
एमआयएमने काल आपल्या पहिल्या आठ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यापाठोपाठ आज बहुजन समाज पार्टीने आपल्या दहा उमेदवाराच्या नावांची घोषणा आज केली आहे. महायुतीतील शिवसेना-भाजपच्या (BJP) युतीसाठी बैठकांवर बैठका सुरू आहेत. आता पर्यंत चर्चेच्या तीन फेऱ्या झाल्या आहेत. आज युतीची घोषणा होईल असे अपेक्षित होते, मात्र आता पुन्हा निर्णय उद्यावर गेला आहे.
इकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील महाविकास आघाडीची बोलणी अंतिम टप्प्यात होती. 29 पैकी 16 प्रभागांचे जागावाटप अंतिम झाल्याचा दावा अंबादास दानवे यांनी केला होता. तर आज काँग्रेसने (Congress) 115 पैकी 65 जागा मागितल्याने आघाडीची चर्चा ठप्प झाल्याचे दानवे यांनीच स्पष्ट केले.
युती-महाविकास आघाडीत अशी तानातानी सुरू असताना एमआयएम, बसपा सारख्या पक्षांनी मात्र स्वबळावर पुढे जात आपापल्या उमेदवारांच्या पहिल्या याद्या जाहीर केल्या आहेत. 2015 मध्ये झालेल्या महापालिकेत एमआयएमने 26 नगरकेवक निवडून आणले होते. तर बसपाचे पाच नगरसेवक निवडून आले होते.
आता 2025 साठीही बसपा मैदानात उतरली असून सामाजिक समतोल आणि सर्व घटकांना प्रतिनिधित्व देण्याच्या भूमिकेतून बसपाने विविध प्रभागांतील उमेदवारांची घोषणा केल्याचा दावा केला जात आहे.
या यादीत सर्वसाधारण, अनुसूचित जाती, ओबीसी तसेच महिला उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. बसपाच्या पहिल्या यादीत प्रभाग 28 ब(ओबीसी), प्रभाग 19 ड (सर्वसाधारण), प्रभाग 24 अ(एससी), प्रभाग 27 ड(सर्वसाधारण), तर प्रभाग 28 ड(सर्वसाधारण) मधून उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. याचप्रमाणे प्रभाग 8 ड (सर्वसाधारण),प्रभाग 3 ड(सर्वसाधारण), आणि प्रभाग 9 अ (एससी), प्रभाग 29 अ(एसी), प्रभाग 24 मधून ओबीसी महिलेला प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.
पक्षातर्फे 32 जणांची उमेदवारी जाहिर केली जाणार आहे. 50 पेक्षा अधिक इच्छुकांनी विविध प्रभागासाठी मुलाखती दिलेल्या आहेत. लवकरच दुसरी यादी जाहिर केली जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.