छत्रपती संभाजीनगर महापालिकेवरील सत्ता मिळवण्यासाठी तीन दिग्गज नेते — संजय शिरसाट, अतुल सावे आणि अंबादास दानवे — प्रतिष्ठेची लढत लढत आहेत.
या निवडणुकीत भाजप, शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात तगडी स्पर्धा पाहायला मिळणार आहे.
स्थानिक पातळीवर ही निवडणूक सर्व पक्षांसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न बनली असून, राज्याच्या राजकारणात तिचा परिणाम दिसणार आहे.
Local Body Election 2025 : महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीमध्ये अनेक माजी पदाधिकाऱ्यांना फटका बसला तर काही जण लक्की ठरले. प्रभाग 29 हा तीन नगरसेवकांचा असून, त्यात एक नगरसेवक सर्वसाधारण महिला असल्याने माजी महापौर अनिता घोडेले यांना संधी मिळणार असली तरी नंदकुमार घोडले यांना दुसरा प्रभाग शोधावा लागणार आहे.
तर माजी उपमहापौर राजू शिंदे, माजी सभापती दिलीप थोरात, माजी नगरसेवक कैलास गायकवाड यांना देखील सुरक्षित प्रभाग शोधावा लागणार आहे. ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेले माजी नगरसेवक गजानन बारवाल, त्र्यंबक तुपे, विकास जैन यांचे प्रभाग मात्र अबाधित आहेत. गेली पंचवीस वर्ष महापालिकेवर शिवसेना-भाजप युतीची कायम सत्ता राहिली. पक्ष फुटीनंतर आता शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि मित्र पक्ष असलेल्या भाजप नेत्यांमध्ये वर्चस्वाची लढाई आहे. पालकमंत्री संजय शिरसाट, ओबीसी मंत्री अतुल सावे तर माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यात सत्तेसाठी टक्कर असणार आहे.
महापालिकेची तब्बल 10 वर्षानंतर निवडणूक होत असून, तीही पहिल्यांदाच प्रभाग रचनेनुसार होत आहे. चार नगरसेवकांचे 28 तर तीन नगरसेवकांचा एक प्रभागानुसार मंगळवारी (ता. 11) प्रभाग रचनेसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. सोडत निघेपर्यंत अनेकांना धाकधूक होती. माजी पदाधिकारी तथा महापालिकेतील दिग्गजांच्या प्रभागात काय आरक्षण निघेल याविषयी शहरवासीयांना उत्सुकता होती. त्यानुसार अनेकांना धक्का बसला आहे.
माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी प्रभाग-29 मधून तयारी केली होती. मात्र या प्रभागात एसस्सी, ओबीसी (महिला), सर्वसाधारण महिला असे आरक्षण निघाले. त्यामुळे नंदकुमार घोडेले यांना इतर ठिकाणाचा शोध घ्यावा लागाणार आहे. असे असले तरी माजी महापौर अनिता घोडेले यांचा मार्ग मोकळा झाला आहे. असाच फटका माजी उपमहापौर राजू शिंदे यांना बसला आहे. त्यांच्या 10 नंबर प्रभागात ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला तर दोन नगरसेवक सर्वसाधारण राहणार आहेत.
त्यामुळे शिंदे यांना नव्या प्रभागाचा शोध घ्यावा लागणार आहे. त्यासोबतच माजी सभापती दिलीप थोरात, माजी नगरसेवक कैलास गायकवाड यांना देखील फटका बसला आहे. असे असले तरी अनेक माजी पदाधिकाऱ्यांना फायदा देखील झाला आहे. प्रभाग 29 हा तीन नगरसेवकांचा आहे. यातील दोन प्रभाग हे महिलांसाठी आरक्षित ठेवण्याचे आदेश सोमवारी (ता. 10) रात्री आल्याचे महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी आरक्षणाची माहिती देताना सांगितले. दरम्यान एसस्सी प्रवर्गाचे आरक्षण काढताना एक आरक्षण याच प्रभागात निघाले. त्यामुळे 29 मधील तीनही नगरसेवक आरक्षित असतील.
1. संभाजीनगर महापालिकेची निवडणूक कधी होणार आहे?
2025 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांअंतर्गत संभाजीनगर महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे.
2. या निवडणुकीत प्रमुख नेते कोण असतील?
संजय शिरसाट (शिंदे गट), अतुल सावे (भाजप) आणि अंबादास दानवे (ठाकरे गट) हे तिघेही या निवडणुकीतील प्रमुख चेहरे आहेत.
3. सत्ता मिळवण्यासाठी कोणत्या पक्षांमध्ये चुरस आहे?
भाजप, शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या तिन्ही गटांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी थरारक लढत होणार आहे.
4. या निवडणुकीचे महत्त्व काय आहे?
संभाजीनगर ही मराठवाड्याची राजकीय राजधानी मानली जाते, त्यामुळे येथील निकालाचा राज्यातील राजकीय समीकरणावर परिणाम होऊ शकतो.
5. स्थानिक नागरिकांची भूमिका काय आहे?
नागरिक या तिन्ही पक्षांच्या कार्यपद्धतीकडे लक्ष ठेवून आहेत आणि विकासाच्या मुद्द्यांवर मतदारांचा कल ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.