Chhatrapati Sambhajinagar Shivsena News Sarkarnama
मराठवाडा

Shivsena News : शिंदेच्या शिवसेनेत चाललंय काय ? संभाजीनगरमध्ये स्थानिक नेत्यांचे जमेना!

Chhatrapati Sambhajinagar sees groupism in Shiv Sena with disagreements among Ministers and MLAs. : जिल्ह्यातील शिवसेनेत 'आॅल इज वेल'नसल्याचे स्पष्ट होते. एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यातील जालना, नांदेड जिल्ह्यामध्ये आभार दौरा केला, पण एक खासदार, सहा आमदार देणाऱ्या संभाजीनगरसाठी मात्र अद्याप वेळ दिलेला नाही.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात सहा आमदार सामाजिक न्याय खात्यासह जिल्ह्याचे पालकमंत्री पद शिंदेंच्या शिवसेनेकडे असले तरी स्थानिक पातळीवर नेत्यांचे मात्र एकमेकांशी जमत नसल्याचे चित्र आहे. नव्या सरकारमध्ये मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असलेले माजी मंत्री अब्दुल सत्तार पक्षापासून अलिप्त आहेत.

मध्यचे आमदार प्रदीप जैस्वाल (Pradeep Jaiswal) यांना पालकमंत्री संजय शिरसाट, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचे ते त्यांना टाळत असल्याची चर्चा आहे. महायुतीचे जिल्ह्यातील एकमेव खासदार संदीपान भुमरे हे ही पैठणमध्येच रमले असून ते अपवादाने पक्षाच्या कार्यक्रमात दिसतात. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नुकताच वाढदिवस झाला.

त्यानिमित्ताने प्रदीप जैस्वाल यांनी आपल्या मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रम राबवले. पण शिवसेना (Shivsena) पक्ष म्हणून एकच असा कुठलाच कार्यक्रम घेण्यात आला नाही. यामागे शिवसेनेतील अंतर्गत नाराजी हे कारण असल्याचे बोलले जाते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील दहा माजी नगरसेवकांना शिंदेसेनेत प्रवेश देण्यावरून पालकमंत्री संजय शिरसाट, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ आणि मध्य चे आमदार प्रदीप जैस्वाल यांच्यात वाद होते, हे आता समोर आले आहे.

लोकसभा निवडणुकीत प्रवेश केलेल्यापैकी काही माजी नगरसेवकांनी आपल्या पक्षाच्या विरोधात काम केल्याचा ठपका ठेवत शिरसाट-जंजाळ जोडीने या पक्ष प्रवेशाला विरोध केला होता. परंतु माझ्या मतदारसंघातील इतर पक्षातील कोणत्या पदाधिकाऱ्यांना प्रवेश द्यायचा, नाही द्यायचा हे मी ठरवेल, अशी भूमिका आमदार प्रदीप जैस्वाल यांनी घेतली होती.

या वादातूनच हा प्रवेश रखडला होता, त्यानंतर स्वत: जैस्वाल यांनीच उमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेळ घेऊन मुंबईत हे प्रवेश घडवून आणले. अपेक्षेप्रमाणे मंत्री संजय शिरसाट, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यावेळी हजर नव्हते. यावरून जिल्ह्यातील शिवसेनेत 'आॅल इज वेल'नसल्याचे स्पष्ट होते. एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यातील जालना, नांदेड जिल्ह्यामध्ये आभार दौरा केला, पण एक खासदार, सहा आमदार देणाऱ्या संभाजीनगरसाठी मात्र अद्याप वेळ दिलेला नाही.

तिकडे शिंदे नाराज, इकडे आमदारांचे पटेना..

राज्यात सत्तातंर होऊन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून मनासारखी खाती, पालकमंत्री न मिळाल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. मुख्यमंत्र्यांच्या बैठकांना जाणं ते टाळत असल्याचे सातत्याने दिसत आहे. तर दुसरीकडे फडणवीस यांच्याकडूनही आपत्ती व्यवस्थापन समितीतून शिंदेंना वगळल्याने शिवसेना-भाजपामधील अंतर वाढत असल्याचे चित्र आहे. तिकडे एकनाथ शिंदे नाराज तर इकडे जिल्हा पातळीवर आमदार, स्थानिक नेत्यांचे पटत नसल्याचे चित्र आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेनेचे सहा आमदार, एक खासदार निवडून आलेला आहे. महायुतीतील शिवसेना हा जिल्ह्यात सर्वात मोठा पक्ष असला तरी अंतर्गत गटबाजीचे ग्रहण त्यांना लागल्याचे चित्र आहे. अब्दुल सत्तार, प्रदीप जैस्वाल, संदीपान भुमरे विरुद्ध संजय शिरसाट आणि जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ अशी सध्या परिस्थिती आहे. यावर एकनाथ शिंदे यांनी लवकर मार्ग काढणे गरजेचे आहे. अन्यथा आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत याचा पक्षाला फटका बसू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT