Chandrakant Khaire-Bhumre-Sanjay Shirsat Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Shirsat : भुमरे घटनाबाह्य पालकमंत्री होते, शिरसाट अन् मी एकाच पक्षात काम केले; खैरेंची पालकमंत्री शिरसाट यांच्याशी हातमिळवणी!

Chandrakant Khaire clarification Handshake with Guardian minister Shirsat : पालकमंत्री संजय शिरसाट आणि शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे एकमेकांना भेटले आणि हस्तांदोलनही केले. अंबादास दानवे यांनीही काही क्षणांसाठी का होईना शिरसाट यांच्याशी संवाद साधला.

Jagdish Pansare

Shivsena UBT News : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या नेत्यांमध्ये आज प्रजासत्ताक दिनानिमित्त काहीसे आनंदाचे वातावरण दिसून आले. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते 26 रोजी प्रथमच शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.


या कार्यक्रमास शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे, (Chandrakant Khaire) शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्यासह जिल्ह्यातील राजकीय मंडळी उपस्थित होती. गेल्या दोन वर्षापासून शिरसाट आणि चंद्रकांत खैरे यांनी एकमेकांवर टीका केली. एवढेच नाही तर खैरे यांनी संदिपान भुमरे पालकमंत्री असताना शासकीय ध्वजारोहण समारंभात त्यांच्या भाषणावर बहिष्कार टाकत व्यासपीठ सोडल्याचेही दिसून आले होते.

संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्यावर मात्र खैरे यांनी असा कोणताही बहिष्कार न टाकता त्यांच्याशी हस्तांदोलन केले. काही मिनिटांच्याच या भेटीने अनेकांच्या भुया उंचावल्या गेल्या.  काही दिवसापासून छत्रपती संभाजीनगरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे.

संजय शिरसाट जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अनेक माजी नगरसेवक येत्या काही दिवसात शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

या पार्श्वभूमीवर दोन्ही शिवसेनेच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये धुसफुस  सुरू आहे. मात्र राजकीय वैर आणि मतभेद बाजूला सारत पालकमंत्री संजय शिरसाट आणि शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे एकमेकांना भेटले आणि हस्तांदोलनही केले.

अंबादास दानवे यांनीही काही क्षणांसाठी का होईना शिरसाट यांच्याशी संवाद साधला. पक्षाला गळती लागलेली असताना एकमेकांच्या विरोधात मैदानात उतरलेल्या या नेत्यांमधील ही काही क्षणांची हातमिळवनी दोन्ही शिवसेनेच्या स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांना सुखावणारी होती.

दरम्यान माध्यमांशी बोलताना खैरे यांनी संदिपान भुमरे यांचे अभिवादन आपण कधीही स्वीकारले नाही त्यामागे ते घटनाबाह्य पालकमंत्री होते हे कारण होते एकनाथ शिंदे यांनी पक्ष फोडून घटनाबाह्य रीतीने मुख्यमंत्रीपद मिळवले होते आणि त्यांच्या सरकारमध्ये उमरे पालकमंत्री असल्याने मी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला हजर राहायचो पण त्यांची भाषण आणि अभिवादनाच्या वेळी निघून जायचो असेही खैर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

संजय शिरसाट आणि मी शिवसेनेच्या स्थापनेपासून एकत्र काम केले आहे. त्यामुळे त्यांच्याशी हस्तांदोलन केले आणि पालकमंत्री झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छाही दिल्या. त्यांच्या कानात 'तुझी इच्छा पूर्ण झाली का' असे विचारल्यावर त्यांनी हसून हो म्हटले, असे खैरे यांनी सांगितले. पालकमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर शिरसाट यांनी आपण सगळ्यांना सोबत घेऊन चालणार आहोत असे सांगितले आहे मलाही त्यांचा फोन आला होता च पालकमंत्री म्हणून काम करताना मला सहकार्य करा मी कोणाशीही चुकीचे आणि भेदभाव पूर्ण वागणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली आहे असेही खैरे म्हणाले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT