Sanjay Shirsat News : 'करारा जवाब मिलेगा', पालकमंत्री संजय शिरसाट यांचा अब्दुल सत्तारांना इशारा!

Guardian Minister Sanjay Shirsat warns former Minister Abdul Sattar : एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा संदीपान भुमरे यांच्यासोबतच शिरसाट यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार होती, पण सत्तारांनी दावा करत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी घातलेल्या राड्याने शिरसाट यांचा मार्ग रोखला.
Sanjay Shirsat-Abdul Sattar Crisis News
Sanjay Shirsat-Abdul Sattar Crisis NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsna News : मंत्री संजय शिरसाट यांची छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री होण्याची इच्छापुर्ती झाली. या निमित्ताने शिवसेनेच्या वतीने नुकताच त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी केलेल्या भाषणात शिरसाट यांनी आपला राजकीय संघर्ष सांगतानाच आपल्याला मंत्रीपद मिळाल्यामुळे काहींच्या पोटात दुखत असल्याचा टोला लगावला. माजी मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे त्यांचा रोख होता.

माझ्या नादाला लागू नका, मी कोणाच्या नादी लागत नाही, पण लक्षात ठेवा आमच्यातील शिवसैनिक अजून जिवंत आहे, असा इशारा देत शिरसाट यांनी (Abdul Sattar) अब्दुल सत्तार यांना 'करारा जवाब'देणार हे स्पष्ट केले. आधी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आणि आता एकनाथ शिंदेंच्यासोबत असलेल्या अब्दुल सत्तार यांच्यामुळे आपली मंत्रीपदाची संधी दोन वेळा हुकली, याचे शल्य शिरसाट यांच्या मनात घर करून आहे.

एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा संदीपान भुमरे यांच्यासोबतच शिरसाट यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार होती, पण सत्तारांनी दावा करत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी घातलेल्या राड्याने शिरसाट (Sanjay Shirsat) यांचा मार्ग रोखला. एवढ्यावरच सत्तार थांबले नाही, तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिरसाट यांना पराभूत करण्यासाठीही आपली शक्ती पणाला लावली होती, असा त्यांच्यावर आरोप आहे.

Sanjay Shirsat-Abdul Sattar Crisis News
Sanjay Shirsat As Guardian Minister : पालकमंत्री पद संजय शिरसाट यांच्यासाठी ठरणार काटेरी मुकुट!

या सगळ्याचा राग संजय शिरसाट यांनी सत्काराच्या भाषणात काढला. अब्दुल सत्तार हे मुळचे शिवसैनिक नाहीत, ते उपरे असल्याची भावना शिवसेनेतील काही आमदारांमध्ये आहे. 'काना मागून आला आणि तिखट झाला'असाच काहीसा प्रकार त्यांच्या बाबतीत घडला. संदीपान भुमरे खासदार झाल्यानंतर पालकमंत्री पदासाठी अब्दुल सत्तार यांनी जोरदार प्रयत्न केले आणि ते मिळवले.

Sanjay Shirsat-Abdul Sattar Crisis News
kirit somaiya- Abdul Sattar News : अब्दुल सत्तार भाजपच्या 'हिटलिस्ट'वर! किरीट सोमय्यांनी मोर्चा वळवला

दोन महिन्याच्या काळात सत्तार यांनी जिल्हा नियोजन समितीची अधिकाधिक निधी आपल्या सिल्लोडमध्ये पळवला.आता या सगळ्याचा वचपा पालकमंत्री संजय शिरसाट काढण्याच्या तयारीत आहेत. जिल्ह्याच्या राजकरणात अब्दुल सत्तार हेच आपले विरोधक आणि टार्गेट असतील हे शिरसाट यांनी काल आपल्या भाषणातून स्पष्ट केले.सत्तार यांनी अद्याप यावर भाष्य केलेले नसले तरी ते शांत बसतील असा त्यांचा स्वभाव नाही.

Sanjay Shirsat-Abdul Sattar Crisis News
Shivsena News : उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर; शिवसेनेच्या सर्व जिल्हाप्रमुखांना 24 जानेवारीला मुंबईत बोलावले

1 जानेवारीला आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने अब्दुल सत्तार यांनी शहरात केलेले शक्ती प्रदर्शन पाहता शिरसाट यांना पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचा कारभार हाकताना सत्तारांचा सामना करावा लागणार आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांच्या विरोधात सत्तारांनी कसा रडीचा डाव खेळला? विरोधकांना पैसे पुरवले हे सगळेच शिरसाट यांनी जाहीरपणे सांगतिले. एकूणच संजय शिरसाट यांनी अब्दुल सत्तार यांना थेट अंगावर घेण्याची भूमिका स्वीकारल्याचे दिसते.

Sanjay Shirsat-Abdul Sattar Crisis News
Eknath Shinde Upset : एकनाथ शिंदे CM देवेंद्र फडणीसांच्या 'त्या' दोन निर्णयामुळे रुसले?

महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सत्तार यांचा हस्तक्षेप मोडून काढण्यासाठी शिरसाट यांनी आतापासूनच त्यांना दूर ठेवण्याचे धोरण आखले आहे. सध्या सिल्लोडमधील साडेचार हजाराहून अधिक बांगलादेशी घुसखोरांना जन्म प्रमाणपत्र दिल्याच्या मुद्यावरून भाजपने अब्दुल सत्तार यांना घेरले आहे. किरीट सोमय्या यांनी काल सिल्लोडचा दौरा करत उपविभागीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

या सगळ्या घडामोडींकडे सत्तार सध्या 'वेट अॅन्ड वाॅच'च्या भूमिकेतून पाहत आहेत. एकाच पक्षांतर्गत विरोध आणि भाजपला अंगावर घेण्याची चूक ते करणार नाहीत. पण सत्तार यांचे राजकारण पाहता ते शांतही बसणार नाहीत, एवढे मात्र निश्चित. त्यामुळे येणाऱ्या काळात शिवसेनेत शिरसाट विरुद्ध सत्तार असा संघर्ष पहावा लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com