Kailas gorntyal, Arjun Khotkar  Sarkarnama
मराठवाडा

EX MLA Kailas Gorantyal News : अर्जुन खोतकरांनी माहिती लपवली; गोरंट्याल यांची कोर्टात धाव!

Congress' Kailash Gorantyal moves court against MLA Arjun Khotkar : जालना जिल्ह्याच्या राजकारणात अर्जुन खोतकर विरुद्ध कैलास गोरंट्याल हा संघर्ष कायमच चर्चेत राहिला आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत अर्जुन खोतकर यांनी कैलास गोरंट्याल यांचा 31 हजारांच्या फरकाने पराभव केला.

Jagdish Pansare

जालना : जालना जिल्ह्याच्या राजकारणात माजी आमदार कैलास गोरंट्याल आणि जालन्याचे विद्यमान आमदार अर्जुन खोतकर यांच्यातील राजकीय वादाची परंपरा यापुढेही सुरूच राहणार असे दिसते. अर्जुन खोतकर यांचा विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज हा विहित नमुन्यात भरलेला नसून त्यांच्याकडून लाभाची पद आणि गुन्ह्याविषयी माहिती लपवण्यात आली आहे, असा आरोप काँग्रेसचे उमेदवार (Kailas Gorantyal) कैलास गोरंट्याल यांनी केला होता.

विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे या संदर्भात त्यांनी तक्रार केली होती. मात्र जिल्हा निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी तो फेटाळत खोतकर यांचा अर्ज कायम ठेवला होता. हा निर्णय मान्य नसल्याने त्याविरोधात कैलास गोरंट्याल यांनी आता (Aurangabad High Court) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

विधानसभेच्या जालना मतदार संघात काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार अर्जून खोतकर यांच्या उमेदवारी अर्जावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे आक्षेप नोंदवला होता. दरम्यान, त्यावेळी दोन्ही उमेदवारांनी एकमेकांच्या उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या माहितीबद्दल निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार केली होती. दरम्यान, 30 ऑक्टोबर रोजी या दोघांच्या आक्षेपावर 3 तास सुनावणी घेण्यात आली होती.

त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने रात्री उशिरा दोन्ही अर्ज वैध असल्याचा निर्णय दिला होता. दरम्यान, हा निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दबावात घेतल्याचा आरोप गोरंट्याल यांनी केला आहे. याच्याविरोधात त्यांनी शुक्रवारी ( ता. 3) खंडपीठात याचिका दाखल केली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जालना मतदारसंघातून शिवसेनेचे अर्जुन खोतकर हे विजयी झाले आहेत. काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांचा त्यांनी पराभव केला.

निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विजयी उमेदवाराच्या विरोधात निवडणूक आयोग किंवा न्यायालयात धाव घेण्याची अनेक उदाहरणे आहेत. जालना जिल्ह्याच्या राजकारणात अर्जुन खोतकर विरुद्ध कैलास गोरंट्याल हा संघर्ष कायमच चर्चेत राहिला आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत अर्जुन खोतकर यांनी कैलास गोरंट्याल यांचा 31 हजारांच्या फरकाने पराभव केला.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला दणदणीत यश मिळाल्यानंतर विधानसभा निवडणुकीत मात्र वाट्याला अपयश आले. जालना विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे कैलास गोरंट्याल पराभूत झाले, हा पराभव त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. त्यामुळे अर्जुन खोतकर यांच्याविरोधात त्यांनी थेट न्यायालयात धाव घेत उमेदवारी अर्ज दाखल करताना खोतकरांनी लाभाचे पद आणि दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती लपवल्याची तक्रार दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT