Nanded Congress Sarkarnama
मराठवाडा

Nanded Congress : कोणता झेंडा घेऊ हाती? अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेड काँग्रेस सैरभैर ?

Ashok Chavan : काँग्रेसने डॅमेज कंट्रोलसाठी चार निरीक्षकांची नियुक्ती केली होती. त्यापैकी एकच निरीक्षक नांदेडला आले.

Laxmikant Mule

Nanded Political News : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी कमळ हातात घेतल्यानंतर नांदेडमधील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांना आता भाजपत जाता येईना आणि चव्हाणांचीही साथ सोडवेना, अशी भावनिक कोंडी झाल्याची दिसून येत आहे. त्यामुळे भाजप की काँग्रेस, कोणता झेंडा घेऊ हाती, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे, तर काही कार्यकर्ते तळ्यात-मळ्यात असून दोन्ही डगरीवर हात ठेवून असल्याचेही बोलले जाते.

नांदेड जिल्ह्यात शतप्रतिशत भाजप करण्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांना (Ashok Chavan) पक्षात प्रवेश देऊन काँग्रेसला खूप मोठा धक्का दिला आहे. या धक्क्यातून काँग्रेसला सावरने खूप कठीण जात आहे. काँग्रेसने डॅमेज कंट्रोलसाठी चार निरीक्षकांची नियुक्ती केली होती. त्यापैकी एकच निरीक्षक नांदेडला आले. आशा कठीण परिस्थितीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी येऊन पदाधिकाऱ्यांना धीर व बळ देण्याची गरज आहे. मात्र, सध्या तरी तसे होताना दिसत नाही. यावरुन काँग्रेसश्रेष्ठींच्याही कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नांदेड शहरात काँग्रेसचे (Congress) पदाधिकारी व नगरसेवकांची संख्या खूप मोठी आहे. नांदेडची परिस्थिती हाताळण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी चार निरीक्षकांची नियुक्ती केली होती. या चार निरीक्षकांपैकी केवळ एका निरीक्षकांच्या व‌ स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला जिल्ह्यातील निम्मे पदाधिकारी उपस्थित, तर निम्म गैरहजर होते. गेल्या महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचे 81 पैकी तब्बल 73 नगरसेवक निवडून आले होते. या माजी नगरसेवकांपैकी काही मोजकेच पदाधिकारी, माजी नगरसेवक उपस्थित होते.

नांदेड शहर (Nanded) व जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या तालमीत तयार झालेले कार्यकर्ते व पदाधिकारी सध्या द्विधा मनस्थितीत आहेत. नांदेड महापालिकेत काही अपवाद वगळता माजी मुख्यमंत्री अशोक यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची सत्ता राहिली आहे. सत्तेचा लाभ सर्वांना मिळाला आहे. त्यामुळे नगरसेवकांचे तळ्यात मळ्यात सुरू असल्याचे दिसून येत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT