Devendra fadnavis, Pratap chikhlikar  Sarkarnama
मराठवाडा

Devendra Fadnavis: फडणवीसांच्या सांगण्यावरूनच प्रताप चिखलीकर राष्ट्रवादीत; भाजपच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

Pratap Chikhlikar joins NCP News : प्रताप चिखलीकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावरून वेगवेगळे आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यामुळे वातावरण तापले असतानाच विरोधकाकडून केल्या जात असलेल्या आरोपाना उत्तर दिले आहे.

सरकारनामा ब्युरो

Nanded News : भाजपकडून 2019 मध्ये लोकसभा निवडणूक लढविताना प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांचा पराभव करीत खासदार झाले होते. मात्र, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी चिखलीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करत लोहा कंधार मतदारसंघातून निवडणूक लढवत विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावरून वेगवेगळे आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यामुळे वातावरण तापले असतानाच विरोधकाकडून केल्या जात असलेल्या आरोपाना उत्तर दिले आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी तिकीट वाटपाबाबत निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच प्रताप पाटील चिखलीकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, असा गौप्यस्फोट भाजपच्या बड्या नेत्यांनी केला आहे.

चिखलीकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) प्रवेशाबाबत भाजपमध्ये नव्याने आलेल्या नेतेमंडळींकडून टीका केली जात आहे. पण अशास्वरूपाच्या टीका टिप्पणीमुळे मला काहीच फरक पडत नाही, असा टोला यावेळी प्रसार माध्यमाशी बोलताना राज्य महिला आघाडीच्या उपाध्यक्षा प्रणिता चिखलीकर यांनी लगावला. प्रणिता या प्रताप चिखलीकर यांच्या कन्या आहेत. त्यांच्या वडिलांनी पक्ष सोडला असला तरी त्या भाजपमध्ये सक्रिय आहेत.

चार महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तिकीट वाटपाबाबतची जी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीच प्रताप पाटील चिखलीकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास सांगितले होते. लोहा-कंधारची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार होती. त्यामुळे दुसरा पर्यायच नव्हता असेही प्रणिता चिखलीकर म्हणाल्या.

त्यानंतर ऐन विधानसभा निवडणुका तोंडावर असताना घडलेल्या या घडामोडीत प्रताप पाटील चिखलीकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि ते लोहा कंधार मतदारसंघातून विजयी झाले. या निवडणुकीत त्यांनी त्यांच्या भगिनी आशा शिंदे यांचा पराभव केला होता.

यावेळी अनेक राजकीय तडजोडी स्वीकाराव्या लागला असल्याचे त्यांनी सांगितले. मला पण भाजपमध्ये राहण्याचा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. तू भाजपमध्ये काम कर मी तुझ्या पाठीशी आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले असल्याचे प्रणिता चिखलीकर यांनी सांगितले.

वडील एका पक्षात आणि मुले वेगळ्या पक्षात हे फक्त नांदेडमध्ये घडले नाही तर इतरत्र या तडजोडी स्वीकाराव्या लागल्या असल्याचे त्यांनी सांगितले. रावसाहेब दानवे आणि त्यांचा पुत्र भाजपमध्ये आहेत तर त्यांची कन्या संजना जाधव या शिवसेना शिंदे गटाच्या आमदार आहेत. माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बाबतीत देखील ही राजकीय तडजोड झाली आहे. त्यांचे चिरंजीव नीलेश राणे शिंदे सेनेचे आमदार आहेत, असेही प्रणिता चिखलीकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून नव्याने भाजपमध्ये आलेले माझ्यावर काय टीका करतात ? याकडे मी लक्ष देत नाही, असेही त्या म्हणाल्या.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT