NCP Pune : रवींद्र धंगेकरांनी धर्मांतराचं रॅकेट राबवल्याचा आरोप केलेला शंतनू कुकडे राष्ट्रवादीचा पदाधिकारीच नाही? 'त्या' पत्रामुळे नवा ट्विस्ट

Shantanu Kukde Arrest : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असलेल्या शंतनू कुकडे याला पोस्को गुन्ह्या अंतर्गत पुणे पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी कुकडेवर गंभीर आरोप करत अजित पवारांकडे या पदाधिकाऱ्याला पक्षातील काढून टाकण्याची मागणी केली आहे.
Ajit Pawar, NCP
Ajit Pawar, NCPSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 03 Apr : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असलेल्या शंतनू कुकडे (Shantanu Kukde) याला पोस्को गुन्ह्या अंतर्गत पुणे पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी कुकडेवर गंभीर आरोप करत अजित पवारांकडे या पदाधिकाऱ्याला पक्षातील काढून टाकण्याची मागणी केली आहे.

मात्र, आता या प्रकरणामध्ये वेगळी माहिती समोर आली आहे. ती म्हणजे शंतनू कुकडे याने यापूर्वीच पक्षाचा राजीनामा दिल्याचं समोर आलं आहे. रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी शंतनू कुकडे संदर्भात गंभीर आरोप केले आहेत. कुकडे पुणे शहरात धर्मांतराचं रॅकेट राबवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Ajit Pawar, NCP
PM Modi Strategy: पंतप्रधान मोदींचा मास्टर स्ट्रोक! वक्फ विधेयकाच्या मंजुरीने निवडणुकांच्या निकालावर परिणाम?

गरीब हिंदू कुटुंबांना आर्थिक प्रलोभन दाखवून तो धर्मांतर करत असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला असून याबाबत पोलिसांनी प्रथम चौकशी करावी अशी मागणी धंगेकरांनी केली आहे. तसंच कुकडे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये पबसारखे अनधिकृत धंदे करत होता.

मात्र, त्याच्या राजकीय वलयामुळे पोलिसांनी त्याच्यावर वेळीच कारवाई केली नसल्याचा आरोपही धंगेकरांनी केला. या संदर्भातील चौकशी करून अजित पवारांनी (Ajit Pawar) तातडीने या पदाधिकाऱ्याची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी धंगेकर यांनी केली होती.

Ajit Pawar, NCP
Shivsena UBT : 'वक्फ' बिलाच्या विरोधी भूमिकेमुळे शिवसैनिक नाराज; ठाकरेंसाठी पुढील आठवडा धक्क्यांचा; भाजपच्या बड्या नेत्याचा दावा

त्यामुळे कुकडेवर अनेक गंभीर आरोप झाल्यानंतर अजितदादा आपल्या या पदाधिकाऱ्याबाबत काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. शिवाय अजितदादा त्याची पक्षातून हकालपट्टी करतील हे जवळपास निश्चित मानलं जात होतं. मात्र, त्याआधीच कुकडेने 26 डिसेंबर 2024 रोजी उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याचं उघडकीस आलं आहे.

या राजीनाम्यामध्ये कुकडने माझ्या कामाचा व्याप जास्त वाढल्याने तसंच तब्येत खालावल्यामुळे माझी मानसिक स्थिती चांगली नसल्यामुळे पक्षाच्या कामासाठी जास्त वेळ देता येत नसल्याने मी पदाचा राजीनामा देत आहे. तरी आपण माझ्या सदस्यत्वाचा व पदाचा राजीनामा स्वीकारावा, अशी विनंती त्याने आपल्या राजीनामा पत्रात केल्याचं आता समोर आलं आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com