Supriya sule : अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'सायलेन्स इज ह्युज पावर'

Ajit Pawar statement News : बारामतीमध्ये एका कार्यक्रमांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझ्यासारखा काम करणारा आमदार बारामतीला मिळणार नाही, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले आहे.
Supriya Sule Vs Ajit Pawar
Supriya Sule Vs Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : बारामतीमध्ये एका कार्यक्रमांमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझ्यासारखा काम करणारा आमदार बारामतीला मिळणार नाही, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले आहे.

बारामतीमध्ये बोलताना अजित पवार यांनी माझ्यासारखा काम करणारा आमदार बारामतीला मिळणार नाही, असा माझा दावा असल्याचे सांगितले होते.1952 ला पहिली निवडणूक झाली. त्यावेळेसपासून बारामतीचे प्रतिनिधित्व करणारे आमदारांची कारकीर्द पहा. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये काय काय काम केले ? याचा आढावा घ्या. तुम्ही मला 1991 पासून आमदार केल्यानंतर मी काय काम केले ते पहा. मी आता माझ्या कामात थांबवणार नाही. तुम्ही मला यंदा लाखांनी निवडून दिले आहे.

त्यामुळे आतापर्यंतच्या माझ्या कारकिर्दीमध्ये प्रत्येक टर्ममध्ये मी जेवढे काम केले नसेल तेवढे जास्त काम यंदाच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये करून दाखवणार आहे. कारण माझ्याकडे अनुभव आहे. कोणत्याही कामासाठी बजेटमध्ये कशा पद्धतीने तरतूद करायची याची माझ्याकडे माहिती आहे. डीपीडीसीच्या माध्यमातून कशाप्रकारे निधी आणायचा त्याची देखील मला माहिती असल्याचे अजित पवार (AJit Pawar) यांनी सांगितले. अजित पवार यांनी या वक्तव्यातून अप्रत्यक्षपणे शरद पवार यांच्यावर टीका केली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Supriya Sule Vs Ajit Pawar
Devendra Fadnavis: भिसे कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी घेतली मोठी जबाबदारी; 'त्या' दोन चिमुकल्या मुलींचा उपचार..

खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) सोमवारी पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी महापालिकेच्या संदर्भातील विविध विकास कामांचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांची संवाद साधताना विविध बाबींवर त्यांनी भाष्य केले. सुप्रिया सुळे म्हणल्या, मंगेशकर हॉस्पिटलमधील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. रुग्णालयाने महापालिकेचा टॅक्स देखील थकवला आहे. तब्बल 27 कोटींचा टॅक्स थकला आहे. सामान्य माणसाकडे टॅक्स राहिले तर महापालिका प्रशासन त्यांच्या घरासमोर बँड वाजवते. मात्र, दीनानाथ रुग्णालयाच्या बाबतीत महापालिका प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Supriya Sule Vs Ajit Pawar
Deenanath Mangeshkar Hospital Tax : 48 तासांत मंगेशकर रुग्णालयाचे 27 कोटी वसूल करा; सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'नाहीतर मी आंदोलनाला बसेल'

पवार साहेब मुख्यमंत्री असताना मंगेशकर कुटुंबियांना रुग्णालयासाठी जागा देण्यात आली. त्यातून हे हॉस्पिटल उभारले गेले आहे. मंगेशकर ट्रस्टीचे रुग्णालय आहे. त्यामुळे मंगेशकर कुटुंबियांना देखील याबाबत विनंती करूयात, असे सुळे म्हणाल्या.

Supriya Sule Vs Ajit Pawar
BJP vs Eknath Shinde: पंकजाताईंनंतर एकनाथ शिंदेंही जनतेच्या मनातले मुख्यमंत्री; भाजपला सहन होईना, वादाची ठिणगी पडलीच!

अजित पवार यांनी बारामतीमध्ये बोलताना माझ्यासारखा काम करणार आमदार आत्तापर्यंत बारामतीला मिळाला नाही असे वक्तव्य केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये कोणालाही बोलण्याचा अधिकार आहे. संविधानाने त्यांना बोलण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे प्रत्येकाने काय बोलावे हे त्यांनी आपापले ठरवावे. 'सायलेन्स इज ह्युज पावर', असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी याबाबत अधिकचे बोलणे टाळले.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

Supriya Sule Vs Ajit Pawar
Uddhav Thackeray : 'वक्फ'चा पहिला फटका महाविकास आघाडीला; उद्धव ठाकरे सोडणार काँग्रेसची साथ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com