Beed Political News : दोनशे दिवसानंतर मी मिडियाशी बोलतो आहे. माझ्यावर जेव्हा इलेक्ट्राॅनिक मिडियाचा ट्रायल सुरू होतं, तेव्हा माझा काही संबंध नसतांना ते बोलत होते. मी कोणाच्याही विरोधात बोललो नाही, बदनाम करण्यासाठी कोणावर आरोप केल नाही. पंचवीस वर्ष मी राजकारणात आहे. आता माझी त्यांना आणि मिडियालाही विनंती आहे, माझ्या अत्याचार झालेल्या भगिनीला न्याय मिळवून देण्यासाठी हा टिकटाॅक बंद करावा, अशा शब्दात आमदार धनंजय मुंडे यांनी विरोधकांना सुनावले.
बीड लैगिंक अत्याचार प्रकरणाच्या तपासासाठी सरकारने महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एसआयटी नेमण्याची घोषणा केली. चोवीस तासाच्या आत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आता आरोपींना शासन होईल, असा विश्वासही धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी व्यक्त केला. एसआयटी स्थापन करण्याची घोषणा झाल्यानंतर विधान भवन परिसरात मुंडे माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला.
बीडच्या (Beed News) खासगी कोचिंग क्लासमध्ये पाच हजार मुलं- मुली नीट परीक्षेची तयारी करत होते. या खाजगी संस्थेत अनेक मुलींवर लैगिंक अत्याचार झाले. त्यापैकी एका मुलीने पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली. एक वर्ष अत्याचार सहन केल्यानंतर ती पुढे आली.आई-वडीलांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला, हे कळाल्यावर मुलीने तक्रार दिली. खटावकर, पवार हे तिथे शिकवतात त्यांनीच या मुलीवर अत्याचार केले.
अनेक पालकांचे आता फोन येत आहेत, आमच्या मुलांच्या बाबतीतही असे प्रकार घडले आहेत, असे ते सांगतायेत. पण इभ्रत जाईल म्हणून कोणी तक्रार द्यायला पुढे धजावत नाहीये. काल मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे भेट घेऊन घटनेची माहिती दिली होती. स्थानिक पोलीस गंभीर नाहीत, या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे. पोलिसांनी तीन दिवसांची पीसी मागितली, कोर्टाने दोन दिवसांची दिली. यावरूनच गौडबंगाल उजागर होते.
हे प्रकरण मॅनेज करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. आपण देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याकडे महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एसआयटी चौकशीची मागणी केली होती. चोवीस तासात एसआयटी नेमण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. अत्याचार करणाऱ्यांना आता शासन होईल याची खात्री आता वाटते, असेही मुंडे म्हणाले.
ते बोलत होते..
दोनशे दिवसानंतर मी मिडियाशी बोलतोय. माझ्यावर जेव्हा इलेक्ट्राॅनिक मिडियाचे ट्रायल सुरू होतं, तेव्हा माझ काही संबंध नव्हता तरी ते बोलत होते. मी कोणाच्याही विरोधात बोललो नाही. मी बदनाम करण्यासाठी कोणावर आरोप केलेले नाही. पंचवीस वर्ष मी राजकारणात आहे, कधी कोणावर खोटे आरोप केले नाही, पाच वर्ष विरोधी पक्षनेता होतो. तेव्हाही मी कोणावर खोटे आरोप पुराव्याशिवाय केले नाही. कधी मी ही खोटे आरोप झाले म्हणून बदनाम झालो नाही. लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी हा टेबलटेनिसचा टिकटाॅक बंद करावा आणि माझ्या भगिनीला न्याय मिळवून देण्यासाठी आपणही मदत करावी, अशी हात जोडून कळकळीची विनंतीही मुंडे यांनी यावेळी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.