Sandip Kshirsagar News : बीड लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी आमदार संदीप क्षीरसागर यांचा राईट हॅन्ड! भावानेच केला आरोप..

The Beed sexual harassment case takes a new twist as MLA Sandeep Kshirsagar's brother claims the victim was the politician’s right-hand man : विजय पवार, प्रशांत खाटोकर असे आरोपी शिक्षकांचे नाव असून त्यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेच्या विरोधात आज शैक्षणिक बंद पुकारण्यात येणार आहे.
Yogesh Kshirsagar-MLA Sandip Kshirsagar News Beed
Yogesh Kshirsagar-MLA Sandip Kshirsagar News BeedSarkarnama
Published on
Updated on

Beed Political News : बीड शहरातील खाजगी शिकवणीमध्ये एका अल्पवयीन विद्यार्थीनीचा लैगिंक छळ केल्याच्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. आरोपी शिक्षक विजय पवार हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा राईट हॅन्ड असल्याचा गंभीर आरोप त्यांचे भाऊ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे योगेश क्षीरसागर यांनी केला आहे. या आरोपानंतर दोन भावांमधील राजकीय संघर्ष या निमित्ताने पुन्हा समोर आला आहे. दरम्यान, अल्पवयीन विद्यार्थीनीवर लैगिंक अत्याचार प्रकरणातील आरोपींवरील कारवाईसाठी शैक्षणिक बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

बीड (Beed News) जिल्ह्यात खाजगी कोचिंग क्लासमध्ये नीटची तयारी करणाऱ्या एका 17 वर्षीय मुलीच्या लैंगिक छळाचे प्रकरण काल उघडकीस आले होते. विजय पवार, प्रशांत खाटोकर असे आरोपी शिक्षकांचे नाव असून त्यांच्याविरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेच्या विरोधात सोमवारी शैक्षणिक बंद पुकारण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर त्यांचे बंधू योगेश क्षीरसागर यांनीच गंभीर आरोप केले आहेत. अल्पवयीन मुलीच्या छळ प्रकरणातील आरोपी शिक्षक विजय पवार हा संदीप क्षीरसागर (Sandip kshirsagar) यांचा राईट हॅन्ड असल्याचा आरोप योगेश क्षीरसागर यांनी केला आहे. खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये घडलेल्या या प्रकारानंतर मुलीच्या फिर्यादीवरून दोन्ही शिक्षकांवर पोस्को अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दोन्ही शिक्षक अद्याप फरार आहेत.

Yogesh Kshirsagar-MLA Sandip Kshirsagar News Beed
Beed Crime News : निधी मिळवून देतो म्हणत सात लाखांची फसवणूक; आमदाराच्या पीए विरोधात गुन्हा दाखल!

विजय पवार याला राजकीय पाठबळ असल्याचा आरोप केला जात आहे. अल्पवयीन मुलीचा लैगिंक छळ करून फरार झालेल आरोपी शिक्षक रात्री लोकप्रतिनिधींच्या घरी होता आणि त्या ठिकाणाहून त्याने फोनही केल्याचा आरोप केला जात आहे. आरोपी विजय पवार हा शिक्षण क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून काम करतो. आपल्या व्यवसायाला स्पर्धा निर्माण होऊ नये यासाठी तो दबाव तंत्र वापरतो. याशिवाय जमीन घोटाळ्यातून पवार याने कोट्यवधीची संपत्ती जमवली.

Yogesh Kshirsagar-MLA Sandip Kshirsagar News Beed
MLA Sandip Kshirsagar News : आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर टक्केवारीचा आरोप! महायुतीचे पदाधिकारी रस्त्यावर!

त्यातून येथील राजकारण सुरू असल्याचे योगेश क्षीरसागर यांनी म्हटले आहे. आरोपी विजय पवार विद्यमान आमदारांचे राईट हॅन्ड असल्यासारखे आहेत. घटनेनंतर ते आमदारांच्या घरी गेलेत रात्री. याचा तपास व्हायला पाहिजे. यांचे कुठे कुठे फोन कॉल गेलेत? कुठून दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला? इतक्या गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपी फरार राहतोच कसा? याचा तपास झाला पाहिजे, अशी मागणी योगेश क्षीरसागर यांनी केली आहे.

Yogesh Kshirsagar-MLA Sandip Kshirsagar News Beed
दोन्ही पुतण्यांनी सोडली साथ ; Jaidatta Kshirsagar म्हणतात ... |Sandeep Kshirsagar |Yogesh Kshirsagar

राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. उमा किरण क्लासेस मधील दोन प्राध्यापकांवर गंभीर आरोप असून हे प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याचा आयोगाने नमूद केला आहे. आरोप निश्चित होईपर्यंत क्लासेसची इमारत सील ठेवावी. सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घ्यावं व फरार आरोपींचा शोध घ्यावा असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. इतर विद्यार्थ्यांच्या तक्रारींची ही नोंद घ्यावी अशा सूचना महिला आयोगाने केल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com