Praful Patel, Padmasinh Patil sarkarnama
मराठवाडा

Dharashiv Loksabha Constituency : प्रफुल्ल पटेलांना झाली पद्मसिंह पाटलांची आठवण; अन् थेट घरी जाऊन घेतली भेट...

Ajit Pawar अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पद्मसिंह पाटील व राणा पाटील यांच्याशी अनेक नेत्यांचे सूर पुन्हा जुळत आहेत.

Jagdish Pansare

Dharashiv News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून शरद पवारांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे आणि नातेसंबंध असणारे धाराशिवचे माजी मंत्री डाॅ. पद्मसिंह पाटील आणि त्यांचे कुटुंब यांच्यात आता दुरावा निर्माण झाला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढलेल्या राणाजगजितसिंह पाटील यांचा शिवसेनेच्या ओमराजे निंबाळकर यांच्याकडून पराभव झाला.

त्यानंतर विधानसभेला राणा पाटलांनी मोठा राजकीय निर्णय घेत थेट राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. धाराशिवमध्ये राष्ट्रवादीची संपूर्ण ताकद आणि भिस्त पाटील पिता-पुत्रांवर होती. पवारांसाठी हा मोठा धक्का होता. तेव्हापासून पद्मसिंह पाटील, राणा पाटील आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे संबंध बिघडले. कधी काळी पद्मसिंह पाटील त्यांच्यासोबत काम केलेल्या राज्यातील आणि केंद्रातील मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारीही अंतर राखून होते.

परंतु अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पद्मसिंह पाटील व राणा पाटील यांच्याशी अनेक नेत्यांचे सूर पुन्हा जुळत आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी राज्यातील सत्तेत सहभागी झाली, त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी हे आता मित्र पक्ष बनले आहेत. त्यामुळे सहाजिकच जुनं सगळं विसरून एकत्र काम करण्याची साद ऐकमेकांना घातली जात आहे.

धाराशिव लोकसभा मतदारसंघातून राणापाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना महायुतीची उमेदवारी मिळवून देत अजित पवार यांनी एक पाऊल पुढे टाकले. त्यानंतर आता कधी काळी पद्मसिंह पाटील यांच्याबरोबर काम केलेल्या अनेक नेत्यांनाही त्यांची आठवण येऊ लागली आहे. अर्चना पाटील यांच्या प्रचारानिमित्त धाराशिवमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली.

या निमित्ताने राष्ट्रवादी चे बहुतांश नेते धाराशिवमध्ये होते. सभा संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी ताबडतोब पद्मसिंह पाटील यांच्याशी संपर्क साधला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पाटील यांनी होकार देताच त्यांच्या निवासस्थानी प्रफुल्ल पटेल आणि पद्मसिंह पाटील यांची भेट घडवून आणली. साहजिकच या भेटीत जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. चहा-बिस्कीट घेत पटेल आणि पाटील यांच्यात बरीच चर्चा रंगली. जुन्या आठवणी आणि किस्से याची उजळणी या निमित्ताने दोन्ही नेत्यांमध्ये झाली.

Edited By : Umesh Bambare

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT