Dharashiv Mahayuti Sarkarnama
मराठवाडा

Mahayuti Melva : धाराशिव महायुतीच्या मेळाव्यात 'असमन्वय'; शिंदेच्या इच्छुक नेत्याला...

Ravindra Gaikwad : महायुतीच्या 'हम साथ साथ हैं'च्या प्रारंभालाच पडला मिठाचा खडा...!

सरकारनामा ब्यूरो

शितल वाघमारे

Dharashiv Political News : नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान व्हावेत, यासाठी महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना या प्रमुख तीन बलाढ्य पक्षांसह 14 घटक पक्षांची मोट बांधली जात आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत विरोधकांना धोबीपछाड देण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी सर्व ‘सोय’ केली आहे. याचा एक भाग राज्यातील ३६ जिल्ह्यात एकाच दिवशी जिल्हास्तरावर समन्वय मेळावे पार पडले. यातील धाराशिवमधील या समन्वय मेळाव्यात मात्र महायुतीतील असमन्वयाचे दर्शन घडले. लोकसभेसाठी इच्छूक शिवसेनेच्या नेत्याला मेळाव्यात बोलूच दिले नाही.

धाराशिव (Dharashiv) शहरातील स्वस्तिक मंगल कार्यालयात रविवारी महायुतीच्या जिल्हास्तरीय समन्वय समितीने कार्यकर्ता मेळावा पार पडला. महायुतीतील राष्ट्रवादी (अजित पवार गट), शिवसेना आणि भाजप पक्षातील स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी एकेकाळी एकमेकांचे विरोधक म्हणून काम केलेले आहेत. आता या कार्यकर्त्यांचे मनोमिलन व्हावे आणि लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला सभागृहात पाठवावे, यासाठी चार दिवसांपूर्वी समन्वय समिती स्थापन करण्यात आली.

या समितीचे नेतृत्व प्रामुख्याने भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील (Ranajagjitsinha Patil), शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांच्याकडे आहे. समितीत इतर घटक पक्ष व संघटनांचे पदाधिकारीही समाविष्ट आहेत. रविवारच्या मेळाव्यात पहिल्यांदा भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी मनोगत व्यक्त करण्याचा श्रीगणेशा केला. त्यानंतर प्रा. सुरेश बिराजदार, त्यापाठोपाठ आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले, पालकमंत्री तानाजी सावंतांनी आपले म्हणणे मांडले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सुरेश बिराजदार यांचे भाषण सुरू असताना उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले आणि माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड (Ravindra Gaikwad) यांचे आगमन झाले. ज्ञानराज चौगुलेांनी मनोगत व्यक्त केले, मात्र रवींद्र गायकवाड यांचे नाव मार्गदर्शन करण्यासाठी घेतले गेले नाही. एकेकाळी नॉट रिचेबलचा धब्बा लागलेले गायकवाडांना समन्वय समितीने बोलू दिले नसल्याने सभागृहात चर्चेला उधाण आले. त्यावेळी शिवसैनिक व इतर घटक पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.

रवींद्र गायकवाडांनी नोव्हेंबरमध्ये वरिष्ठांनी संधी दिल्यास लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते. त्या अनुषंगाने त्यांनी मतदारसंघामध्ये दौरे व गाठीभेटीही सुरू केल्या होत्या. महायुतीसाठी आपले आगामी प्रयत्न काय असतील, हे सांगण्यासाठी गायकवाड यांनी बोलण्याची विनंती समितीकडे केली. मात्र त्यांना बोलण्याची संधी समितीने दिली नाही. त्यावरून समन्वय समितीच्या या पहिल्याच मेळाव्यात असमन्वयाचे दर्शन घडून आले. इच्छूक गायकवाडांचा संधी बोलण्याची संधी नाकारल्याने पुढील काळात परिणाम काय होणार, याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT