Uddhav Thackeray : नाशिकच्या अधिवेशनासाठी उद्धव ठाकरेंचा मोठा डाव; ग्रामीण भागात...

Jayant Dinde : अधिवेशनातील उद्धव ठाकरेंच्या सभेमुळे ठाकरे गटाला फायदा होणार
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Nashik Political News : नाशिक शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अधिवेशन पार पडणार आहे. हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी कार्यकर्ते जीवाचे रान करताना दिसत आहे. यासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात लोकसभा संपर्क प्रमुख जयंत दिंडे सातत्याने बैठका घेत आहेत. यावेळी सेनेचे अधिवेशन आणि लोकसभा निवडणूक ठाकरे गटासाठी आर पार की लढाई ठरणार असल्याने अधिवेशन तयारीचा सातत्याने आढावासुद्धा घेतला जातो आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) 22 जानेवारी रोजी शहरात दाखल होणार आहेत. राम मंदिर सोहळ्याच्या आयोजनाच्या निमित्ताने ते गोदा आरती करतील. तसेच श्री काळाराम मंदिराचे दर्शन सुद्धा घेणार आहेत. यानंतर 23 जानेवारी रोजी गोल्फ क्लब मैदानावर त्यांची जाहिर सभा होणार आहे. शिवसेनेचे अधिवेशन तसेच ठाकरेंच्या सभेमुळे शिवसेनेला नाशिकला मोठा फायदा होईल, असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आहे.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : दिव्यात उद्धव ठाकरेंकडे एकही शाखा नाही; मतदारांपर्यंत पोहोचण्याची रणनीती काय ?

कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांमध्ये सत्ताधारी भाजपाबाबत असलेला राग मतदानात रूपांतरीत करण्याचे नियोजन पक्षाने आखले आहे. यासाठी पक्षाने ग्रामीण भागाकडे मोर्चा वळवला आहे. दिंडोरी लोकसभा संपर्कप्रमुख जयंत दिंडे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर निफाड, दिंडोरी, कळवण, सटाणा आदी तालुक्यामध्ये बैठकींचे सत्र दिंडेकडून राबवले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आयोध्यातील राम मंदिर (Ram Temple) सोहळ्याला भाजपाने राजकीय रंग दिला. वनवासावेळी श्रीराम नाशिकमध्ये होते. सर्वाधिक काळ ते येथे वास्तव्यास होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनासाठी नाशिकची निवड केली. येथूनच ते लोकसभेचे रणसिंग फुंकणार आहे. त्यामुळे शिवसैनिकांवर मोठी जबाबदारी असून, ती ते समर्थपणे पेलतील, असे भावनिक आवाहन दिंडे यांच्याकडून बैठकी दरम्यान करण्यात येते आहे.

या बैठकींना प्रतिसाद मिळत असून, नाशिक लोकसभा मतदार संघात सुद्धा बैठकींचे आयोजन होते आहे. दरम्यान, दादा भुसे यांच्या रूपाने बसलेला मोठा धक्का पचवून नाशिकचा ग्रामीण भाग ठाकरे यांच्या पाठीशी उभा राहणार काय, असा प्रश्न यानिमित्ताने पुढे येतो आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Uddhav Thackeray
Solapur BJP Politics : सोलापूरसाठी लक्ष्मण ढोबळेंची मोर्चेबांधणी सुरू; भाजपच्या निर्णयाकडे लक्ष

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com