Maharashtra Assembly Election 2024 : सत्ताधाऱ्यांकडे सांगण्यासारखे काही नाही, मुळात त्यांनी विकास कामे केली नाही, कारण त्यांच्याकडे तशी दृष्टीच नाही. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना वेठीस धरून ते पुन्हा सत्तेवर येऊ पाहत आहेत. पण येणाऱ्या काळात महायुती महाराष्ट्राला विकासापासून आणखी दूर घेऊन जाईल, असा इशारा धीरज देशमुख यांनी दिला.
लातूर ग्रामीण विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लातूर तालुक्यातील गातेगाव, एकुरगा व ढाकणी येथील ग्रामस्थांशी महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज देशमुख (Dhiraj Deshmukh) यांनी संवाद साधला. काँग्रेस व महाविकास आघाडी केलेले काम आणि विकासाचे मुद्दे घेऊन निवडणुकीला सामोरे जाते आहे. मात्र विरोधकांकडे ना केलेले काम आहे ना विकासाची दृष्टी आहे.
'लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थ्यांना वेठीस धरून सत्तेत येऊ पाहणारे येणाऱ्या काळात महाराष्ट्राला विकासापासून आणखी दूर घेऊन जाणार आहेत. (Latur) त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला साथ देऊन पुन्हा मला सेवेची संधी द्या, असे आवाहन देशमुख यांनी मतदारांना केले.
लातूर ग्रामीणमध्ये अनेक शेतकरी बांधव रेशीम शेतीमध्ये प्रयोग करीत होते, त्यांना आर्थिक पाठबळाची गरज होती , मात्र अनेक बँका त्यांना ते उपलब्ध करून देत नव्हत्या. मात्र लातूर जिल्हा बँकेतर्फे आम्ही पुढाकार घेऊन त्यांच्या मागे उभे राहिलो, माझ्या शेतकरी बांधवाच्या चेहऱ्यावरील समाधान मला कामाची ऊर्जा देते.
लातूर जिल्ह्यामध्ये अनेक शेतकरी बांधव नव्या तंत्रज्ञानाचा वापर करीत कृषि पूरक व्यवसाय करु इच्छित होते. त्यांना पाठबळाची गरज होती. आम्ही जिल्हा बँकेच्या मार्फत त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिलो आणि त्यांना पाठबळ दिलं, त्यांनी भरारी घेतली त्यांच्या भरारीच कौतुक आहे.
असेच कार्य पुढे देखील सुरू ठेवायचे हा संकल्प आमचा आहे. म्हणूनच लातूरसाठी लढायचं आणि जिंकायचं, असे धीरज देशमुख यांनी सांगितले. कोरोना व इतर आपत्तीच्या काळात महाराष्ट्रातील जनतेबरोबर उभे राहणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला षडयंत्राने पाडून सत्तेत आलेले भाजप -महायुतीचे सरकार आता मतदान महाराष्ट्राचे मागतेय आणि काम गुजरातचे करतेय. त्यांच्या खोट्या प्रचाराला बळी न पडता काँग्रेस व महाविकास आघाडीच्या मागे भक्कमपणे उभे राहावे, असे आवाहन देशमुख यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.