Chhatrapati Sambhajinagar Loksabha Constituency : लोकसभा निवडणूक जाहीर होऊन आठवडा होत आला असला तरी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या एकाच जागेवरील दाव्यामुळे जागावाटप रखडले आहे. त्यात मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) जागेवर भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेत चढाओढ सुरू आहे. दरम्यान, संभाजीनगर लोकसभेची जागा भाजपनेच (BJP) लढवावी, ही तर जनतेची इच्छा असल्याचा दावा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. bhagawat Karad) यांनी केला. Latest Marathi News on politics
संभाजीनगरच्या जागेवर शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण जनतेची भावना तीव्र असून, या ठिकाणी भाजपनेच लढावे असा त्यांचा आग्रह आहे. भाजपाच्या बूथप्रमुखापासून तर लोकसभेच्या प्रभारीपर्यंत सगळ्यांनीच गेल्या दीड वर्षापासून मतदारसंघात जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे हा मतदारसंघ भाजप जिद्दीने लढले आणि जिंकेल, असा विश्वासही कराड यांनी व्यक्त केला आहे.
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar Constituency) लोकसभा मतदारसंघाची जागा भाजप लढवणार असे संकेत गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी त्यांच्या जाहीर सभेत दिले होते. तत्पूर्वी संभाव्य उमेदवार म्हणून डॉ. कराड (Dr. Bhagawat Karad) हे गेल्या दीड वर्षापासून मतदारसंघात कामाला लागले होते. परंतु जागावाटपाची बोलणी जसजशी पुढे सरकली तसा शिवसेना शिंदे गटाने संभाजीनगरच्या जागेवर दावा सांगत ही जागा भाजपला देण्यास कडाडून विरोध दर्शवला.
शिवसेना-भाजप (Shivsena- BJP) युतीमध्ये गेल्या 30-35 वर्षांपासून हा मतदारसंघ शिवसेना लढत असल्यामुळे या जागेवर सर्वप्रथम आमचा अधिकार असल्याचा दावा शिंदेंकडून (Ekanth Shinde) केला जात आहे. भाजपने (BJP) मराठवाड्यातील चार लोकसभा मतदारसंघांत उमेदवार जाहीर करून आघाडी घेतली असली तरी उर्वरित चार मतदारसंघांपैकी आणखी एखादा मतदारसंघ आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपचे दिल्लीतील नेते प्रयत्नशील आहेत. Latest Political News
दुसरीकडे शिंदे यांच्यासोबत असलेल्या 13 विद्यमान खासदारांपैकी तीन ते चार खासदारांना या निवडणुकीत नारळ दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या गोटात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत संभाजीनगरची जागा सोडायची नाही, असा ठाम निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेला आहे.
संभाजीनगरच्या जागेसाठी मुख्यमंत्री स्वतःच आग्रही असल्यामुळे कदाचित राज्यातील व दिल्लीतील नेते एक पाऊल मागे घेऊन संभाजीनगरची जागा शिवसेना शिंदे गटाला देऊ शकते. याचा अंदाज भागवत कराड व त्यांच्या समर्थकांना आला असावा, त्यामुळेच कराड हे सोशल मीडियाच्या माध्यमातून संभाजीनगर लोकसभेची Loksabha Election 2024 जागा भाजपनेच लढवावी, अशी जनतेची इच्छा असल्याचे सांगून दबाव आणू पाहत आहेत.
येत्या दोन दिवसांत संभाजीनगरची जागा कोण लढवणार? हे स्पष्ट होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला जाणार हे निश्चित असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे जनतेची इच्छा ही जागा भाजपने लढवावी, अशी असली तरी दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची इच्छा महत्त्वाची ठरणार आहे. election campaign strategies
Edited By : Rashmi mane
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.