Shiv sena Appointment News Chhatrapati Sambhajinagar News Sarkarnama
मराठवाडा

Shivsena : पक्षप्रवेशानंतर पदासाठी वेटिंगवर असलेल्या तनवाणी, तुपे, माने, पाटील यांना एकनाथ शिंदेंनी दिली मोठी जबाबदारी!

Shivsena Get Ready To Local Body Election 2025 : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेवत लोकसभा प्रभारी आणि सहसंपर्कप्रमुख पदांची जबाबदारी सोपवत एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रवेश केलेल्यांना कामाला लावले आहे.

Jagdish Pansare

  1. शिवसेनेत नुकतेच प्रवेश केलेले तनवाणी, तुपे, पाटील आणि माने यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठी जबाबदारी सोपवली आहे.

  2. छत्रपती संभाजीनगरमध्ये येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना संघटनात्मक तयारीला वेग आला आहे.

  3. शिंदे गटाकडून या नवीन नियुक्त्या हा ‘मराठवाड्यातील मजबूत सेनेचा पाया’ मानला जात आहे.

योगेश पायघन

Marathwada Political News : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केलेले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील माजी आमदार, महौपार, नगरसेवक हे पद आणि जबाबदारीसाठी वेटींगवर होते. अखेर दोन दिवसांपुर्वी झालेल्या गटप्रमुखांच्या मेळाव्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माजी आमदार किशनचंद तनवाणी, कैलास पाटील, अण्णासाहेब माने तसेत माजी महापौर त्र्यंबक तूपे यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपवली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेवत लोकसभा प्रभारी आणि सहसंपर्कप्रमुख पदांची जबाबदारी सोपवत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गेल्या काही महिन्यात पक्षप्रवेश केलेल्यांना कामाला लावले आहे. पक्षप्रवेश होऊनही पद, जबाबदारी मिळत नसल्याने या नेत्यांमध्ये काहीशी नाराजी होती. अखेर ती दूर करण्यात आली आहे. महिनाभरात मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यासह प्रमुख नेत्यांचे दोन दौरे झाले. पक्षाचे मेळावे, पदाधिकारी संवाद, आढावा बैठका सुरू झाल्या आहेत.

आमदार किशनचंद तणवाणी यांच्याकडे प्रभारी लोकसभा प्रमुख, तर माजी आमदार कैलास पाटील यांच्याकडे गंगापुर-खुलताबाद मतदारसंघ आणि माजी आमदार अण्णासाहेब माने यांच्याकडे वैजापूर मतदार संघातील सहसंपर्क प्रमुख पदाची धुरा सोपवली आहे. तर नुकतेच शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केलेल्या माजी महापौर त्र्यंबक तुपे यांच्याकडे फुलंब्री मतदार संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ही सर्व पदे एक वर्षासाठी प्रभारी असणार आहे.

घोडले वेटींगवरच..

नव्यानेच पक्षात आलेले तूपे, माने पाटील, कैलास पाटील यांना एकनाथ शिंदे यांनी पद आणि जबाबदारी दिली असली तरी माजी महापौर नंदकुमार घोडेले, अनिता घोडेले हे मात्र अद्यापही वेटींगवरच आहे. या दांपत्याकडे अद्याप कोणतीही जबाबदारी सोपवण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे घोडेले यांनी वरील सर्व नेत्यांच्या आधी शिवसेनेत प्रवेश केला होता.

शिवसेनेने सप्टेंबर महिन्यात मराठवाडास्तरीय पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी संत एकनाथ रंगमंदिरात पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी जिल्ह्यातील सुत्रे ही पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडे असतील याचे सुतोवाच केले होते. त्यानंतर पक्षाच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे स्तंभ पूजन झाले. पालकमंत्र्यांनीही नुकताच महिला पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. त्यानंतर पुन्हा एकनाथ शिंदे यांनी गटप्रमुखांशी संवाद साधत निवडणुकीच्या तायरीला लागण्याच्या सुचना दिल्या.

सत्तेचे विकेंद्रीकरण

पालकमंत्री जिल्ह्याची धुरा संभाळतील, लोकसभा कार्यक्षेत्रात खासदार आहेच. त्याशिवाय विधानसभा मतदारसंघनिहाय कामाची विभागणी करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुखांकडे तीन तीन विधानसभा मतदार संघ, त्यांच्या अंतर्गत तालुकाप्रमुख, त्यांच्यावर सहसंपर्क प्रमुखांकडे एक विधानसभा मतदार संघ आणि त्याशिवाय लोकसभा मतदार संघासाठी लोकसभा प्रभारी अशी रचना शिवसेनेत करण्यात आली आहे. त्यामुळे सत्तेचे विकेंद्रीकरण होईल आणि कामकाज सुटसुटीत होईल अशी रचना पक्षासाठी महत्त्वाची ठरणार असून भविष्यातील धोकेही या रचनेमुळे येणार नाहीत याचीही खबरदारी घेण्यात आल्याचे दिसते.

FAQs

Q1. एकनाथ शिंदेंनी कोणाला जबाबदारी दिली आहे?
➡️ तनवाणी, तुपे, पाटील आणि माने या चार नव्या नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Q2. या नेत्यांनी अलीकडेच काय केले होते?
➡️ त्यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला असून, त्यानंतर त्यांना ‘वेटींग’ स्थितीत ठेवण्यात आले होते.

Q3. ही जबाबदारी कोणत्या भागासाठी आहे?
➡️ छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाडा विभागात संघटन बळकटीसाठी या जबाबदाऱ्या दिल्या आहेत.

Q4. यामागे एकनाथ शिंदेंचा उद्देश काय आहे?
➡️ मराठवाड्यात शिवसेनेचा जनाधार वाढवणे आणि आगामी निवडणुकांसाठी संघटना मजबूत करणे.

Q5. या निर्णयावर स्थानिक प्रतिक्रिया काय आहे?
➡️ कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून, नवीन नियुक्त्यांमुळे संभाजीनगरात राजकीय चुरस वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT