Eknath Shinde  sarkarnama
मराठवाडा

Ghansawangi Assembly Constituency : लाडकी बहीण योजनेला पैसे कुठून आणणार? म्हणणाऱ्यांनी आमचा जाहीरनामा चोरला

Mahavikas Aghadi stole our manifesto, Chief Minister alleges : आमचा पक्ष चोरला, आमचा धनुष्यबाण चोरला हा काय खेळ आहे का? लोकशाहीत ज्यांच्याकडे बहुमत आहे. त्यासाठी अधिकृत चिन्ह निवडणूक आयोगाने व सर्वोच्च न्यायालयाच्या मान्यतेने आम्हाला मिळाले आहे.

Jagdish Pansare

Maharashtra Assembly Election 2024 : लाडकी बहीण योजनेला विरोध करणारे व पैसे कुठून आणणार म्हणणारे विरोधक आता लाडक्या बहिणीला तीन हजार रुपये देणार असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे आता ते पैसे आणणार कुठून? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. दरम्यान, महाविकास आघाडीने महायुतीचा वचनामा चोरून नवा वचननामा बनविला आहे, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

घनसावंगी येथे महायुतीचे उमेदवार डॉ. हिकमत उढाण यांच्या प्रचारार्थ सोमवारी (ता.11) आयोजित सभेत ते बोलत होते. (Eknath Shinde) सुनील आर्दड, पंडित भुतेकर, हेमंत गोडसे, रवींद्र तौर, रामेश्‍वर भादरंगे, किर्ती उढाण आदींची उपस्थिती होती. सुरुवातीला लाडक्या बहिणीला विरोध केला, या योजनेत खोडा घातला आता त्यांना जोडा दाखवण्याची वेळ आली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, वयोश्री योजना, युवा प्रशिक्षण योजना, ज्येष्ठ व शेतकऱ्यांच्या अनेक योजनात चौकशी करून जेलमध्ये टाकू असे सांगितले; परंतू त्यांनी मुंगी तरी कधी मारली का? असा टोला शिंदे यांनी महाविकास आघाडीला लावला. (Shivsena) कष्टकरी, शेतकरी, कामगार यांच्यासाठी जेलमध्ये जायची वेळ आल्यास शंभरवेळा जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपयांवरून 2100 रुपये करणार आहोत. कोल्हापूर येथे दहा सूत्री कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी स्वावलंबन योजना राबविण्यात येणार आहे. कोणी भुकेपासून वंचित राहू नये, यासाठी रोटी कपडा, मकान या सुविधा देण्यात येतील. वृद्धांना 2100 रुपये पेन्शन देण्यात येईल, असेही शिंदे यांनी सभेत सांगितले.

आमचा पक्ष चोरला, आमचा धनुष्यबाण चोरला हा काय खेळ आहे का? लोकशाहीत ज्यांच्याकडे बहुमत आहे. त्यासाठी अधिकृत चिन्ह निवडणूक आयोगाने व सर्वोच्च न्यायालयाच्या मान्यतेने आम्हाला मिळाले आहे, असे म्हणत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही त्यांना चांगल्या जागा जिंकून वर्चस्व दाखवले आहे.

एकनाथ शिंदे यांना हलक्यात घेऊ नका, ज्यांनी मला हलक्यात घेतले त्यांचे सरकार उलथावून टाकले, असेही शिंदे म्हणाले. 25 लाख तरुणांसाठी रोजगार निर्मितीसह दहा हजार युवकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 45 हजार पांदण रस्त्यांचे काम हाती घेण्यात येणार आहे. अंगणवाडी, आशा स्वयंसेविकांना 15 हजार रुपये मानधन, शेतकऱ्यांना 7 एचपी विद्युत मोटारीपर्यंत वीजबिल माफ करण्यात येईल, व इतर बिलात 30 टक्के सूट देण्यात येईल आदी निर्णय घेण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT