Cm Eknath Shinde News  Sarkarnama
मराठवाडा

Eknath Shinde News : परभणीत बॅकफूटवर असलेल्या शिवसैनिकांना मुख्यमंत्री बळ देणार...

Prasad Shivaji Joshi

Marathwada Shivsena News : शिवसेनेत झालेल्या बंडाळीचा परभणी जिल्ह्यात फारसा प्रभाव जाणवला नाही. खासदार संजय जाधव व परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी निष्ठा राखली. (Eknath Shinde News) शिवसेनेचे माजी खासदार सुरेश जाधव, माजी आमदार हरिभाऊ लहाने, माजी जिल्हाप्रमुख भास्कर लंगोटे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचे ठरवले. पाथरी येथील सईद खान यांनी मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन केले.

मात्र पक्षाचा प्रमुख मुख्यमंत्री असताना अद्यापही (Shivsena) शिवसेनेतील कार्यकर्त्यांना अपेक्षित न्याय मिळत असल्याचे दिसून येत नाही. याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा 11 रोजीचा परभणी दौरा अतिशय महत्त्वाचा ठरतो. विविध विकासकामांना निधीवाटप करताना सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त निधी मिळावा, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा असते. मात्र निधीवाटपात अन्याय होत असल्याची भावना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.

महानगराध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी याबाबत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर मंजूर केलेल्या यादीला स्थगिती देण्यात आली होती. (Parbhani) नुकतेच जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी अशासकीय सदस्यांच्या नियुक्ती जाहीर करण्यात आल्या. जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या या समितीमध्ये सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व मिळावे, अशी अपेक्षा असताना एकूण नऊपैकी शिवसेना शिंदे गटाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. त्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे चार सदस्य, तर भाजपच्या तीन सदस्यांची समितीवर नेमणूक करण्यात आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सईद खान सक्रिय

शिवसेनेत प्रवेश केलेले बहुतांश नेते अन्य पक्षातून आलेले आहेत. संपर्कप्रमुख माजी खासदार सुरेश जाधव यांनी शिवसेना सोडल्यानंतर मनसे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नशीब आजमावून बघितले होते. माजी आमदार हरिभाऊ लहाने यांनी पाथरी विधानसभा मतदारसंघात मनसेकडून निवडणूक लढवली होती. माजी आमदार माणिकराव आंबेगावकर यांनीही शिवसेना सोडल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

मात्र पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पाथरी येथील सईद खान यांनी मुंबई, परभणी व पाथरी येथे पक्षाचे जाहीर कार्यक्रम आयोजित करून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. नुकतेच पाथरी येथे नोकरी मेळावा आयोजिण्यात आला होता. त्यास खासदार श्रीकांत शिंदे यांनी हजेरी लावून सईद खान यांना बळ देत त्यांचे पक्षातील स्थान अधोरेखित केले. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने परभणी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भाजपला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT