EX MLA Shivaji Chothe Resion Shivsena UBT News Jalna Sarkarnama
मराठवाडा

Shivsena News : माजी महापौरानंतर आता माजी आमदाराचा उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र!

Ex-MLA Shivaji Chothe praised Uddhav Thackeray with a ‘Jai Maharashtra’ : मी पक्षाचा राजीनामा जरी देत असलो तरी माझ्या हृदयात बाळासाहेब ठाकरे, आपण आणि मातोश्रीबद्दलाचा आदर, स्नेह कायम राहील.

Jagdish Pansare

Jalna Politics : छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत आज मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला. तर त्यापाठोपाठ जालना जिल्ह्यातील अंबडचे माजी आमदार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान सहसंपर्कप्रमुख शिवाजी चोथे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षात मोठ्या घडामोडी सुरू झाल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर पाठोपाठ शेजारच्या जालना जिल्ह्यातही पक्षाला धक्का बसला आहे. माजी आमदार आणि चाळीस वर्ष आधी बाळासाहेब ठाकरे आणि नंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काम करणारे शिवाजी चोथे यांनी आज पक्षाला जय महाराष्ट्र केला. उद्धव ठाकरे यांच्याकडे प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आपण वैयक्तिक कारणामुळे पक्ष सोडत असल्याचे चोथे यांनी म्हटले आहे.

मी चाळीस वर्षे शिवसेनेत विविध पदांवर काम केले. त्या माध्यमातून जनतेचे अनेक प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आपला स्नेह, प्रेम नेहमीच या काळात माझ्या पाठीशी राहीले. (Jalna) त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. काही वैयक्तिक कारणांमुळे मी माझ्या शिवसेना सहसंपर्कप्रमुख पद व शिवसेना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा आपल्याकडे नम्रपणे देत आहे.

माझ्या आजपर्यंतच्या संपूर्ण राजकीय त्याचप्रमाणे सहकार क्षेत्रातील व शैक्षणिक क्षेत्रातील वाटचालीत आपली साथ मला नेहमीच मिळत आलेली आहे. मी पक्षाचा राजीनामा जरी देत असलो तरी माझ्या हृदयात बाळासाहेब ठाकरे, आपण आणि मातोश्रीबद्दलाचा आदर, स्नेह कायम राहील. तसेच शेवटच्या श्वासापर्यंत प्रेमाची भावना यापुढेही पूर्वीप्रमाणेच राहील, अशा भावना शिवाजीराव चोथे यांनी राजीनामा पत्रातून व्यक्त केल्या.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर शिवाजीराव चोथे यांचा आता सत्ताधारी शिवसेना पक्षातील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. चोथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लवकरच पक्षप्रवेश करणार असल्याचे बोलले जाते. दरम्यान, जालन्याच्या राजकारणात पुन्हा पक्षांतराचे वारे वाहू लागले आहे. कैलास गोरंट्याल, सुरेश जेथलिया यांच्यानंतर आता माजी आमदार शिवाजी चोथे यांनीही वेगळी वाट निवडली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT