संजय राऊत
Marathwada Politics : जाफ्राबाद शहराच्या नगराध्यक्ष सुरेखा लहाने यांच्याविरुद्ध नगरसेवकांनी दाखल केलेला अविश्वास ठराव आज विशेष सभेत तेरा विरुद्ध तीन मताने पारित झाला. नगराध्यक्ष सुरेखा लहाने यांनी नगरसेवकांना विश्वासात न घेणे यासह अन्य कारणांवरून अविश्वास ठराव दाखल केला होता. अविश्वास ठराव मोठ्या फरकाने पारित झाल्यामुळे लहाने यांचे नगराध्यक्ष पद गेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या त्या नगराध्यक्षा होत्या.
सुरेखा लहाने यांच्याविरोधात गेल्या काही महिन्यापासून नगरसेवकांकडून तक्रारी केल्या जात होत्या. विशेष म्हणजे त्यांच्याच पक्षातील नगरसेवक यात आघाडीवर होते. (NCP) पुढे त्यांना विरोधी नगरसेवकांचीही साथ मिळाली. लहाने यांच्याविरोधात रोष वाढत गेल्याने अखेर त्यांच्या अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय नगरसेवकांनी घेतला होता. त्यानूसार आज विशेष सभा बोलावण्यात आली होती. 13 विरुद्ध 3 मतांनी अविश्वास ठराव पारित झाला. तर एक नगरसेवक मतदानाच्यावेळी गैरहजर राहिला.
अविश्वास ठरावाच्या बाजूने अनिल बोर्डे, शेख रऊफ, मीरा शंकर जयस्वाल, दामोदर वैद्य सुनित गोफणे, सुरेश दिवटे, कमलाबाई गौतम, शेख मुस्ताक, शाहीन बेगम शेख तैजिब, हमीदाबी हक्कमोदींन सिद्दिकी, तातेबखान तय्यब खान, कविता दीपक वाकडे व फरीदा बेगम हरून खान यांनी मतदान केले. (Jalna) तर सुरेखा लहाने यांच्या बाजूने अविश्वासाच्या विरोधात लहाने यांच्यासह फाईम खान, शेख अहमद शेख रहीम यांनी मत नोंदविले. यावेळी 17 सदस्यापैकी शशिकलाबाई विजय हिवाळे या नगरसेविका गैरहजर होत्या.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर, भोकरदनचे मुख्याधिकारी गजानन तायडे यांनी काम पाहिले. जाफराबाद शहरामध्ये 17 सदस्य असलेल्या नगरपंचायतीची 2022 मध्ये निवडणूक झाली होती. महिलासाठी आरक्षित असलेल्या नगराध्यक्ष पदावर सुरेखा लहाने यांची वर्णी लागली होती. दरम्यान यापूर्वीही तीन वेळेस सुरेखा लहाने यांना अविश्वास येऊनही संधी प्राप्त झाली होती. सोमवारी झालेल्या अविश्वास ठरावाच्या बाजूने 13 जणांनी मतदान केल्याने सुरेखा लहाने नगराध्यक्ष पदावरून पायउतार झाल्या आहेत.
साडेतीन वर्षाच्या कालावधीत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षाची चौथ्यांदा खुर्ची खाली करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. शहरातील नगरपंचायतीचा राजकीय कारभार तीन वर्षापासून चर्चेचा विषय बनला आहे. 2022 मध्ये झालेल्या या निवडणुकी नंतर सर्वाधिक काळ हा अविश्वास ठराव आणण्यातच गेला असल्याने शहरातील अनेक कामे प्रलंबित आहेत.
तीनदा अविश्वास बारगळला
नगराध्यक्ष पदाला एक वर्ष पूर्ण होत नाही तोच नगराध्यक्ष लहाने यांच्यावर अविश्वासस ठराव आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यावेळी सतरा पैकी 14 नगरसेवक अज्ञात सहलीवर निघून गेले. तरीही लहाने यांनी आपले पद कायम ठेवले होते. दरम्यान त्यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या पंधरा दिवस आधीच पुन्हा नगराध्यक्षच्या निवडीसाठी नगरसेवक सहलीवर गेले. दरम्यान तत्कालीन नगर विकास मंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व नगराध्यक्षांचा कार्यकाल पाच वर्षाचा केल्याने नशिबाने तेव्हाही त्यांनाच पदाचा लाभ झाला.
दरम्यान नगरसेवकांना विश्वासात न घेणे, शहरातील विकास कामातील अनियमित्ताचा यासह विविध कारणांवरून नगरसेवकांनी नगरविकास मंत्रालयात लहाने यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावेळी पुन्हा तत्कालीन नगर विकास मंत्री शिंदे यांनी सुरेखा लहाने यांचे निलंबन केले. दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने लहाने यांचे निलंबन रद्द केल्याने पुन्हा त्याच नगराध्यक्षपदी कायम राहिल्या. सुदैवाने तीन वेळेस नगराध्यक्ष पद कायम राहिल्यानंतर आता चौथ्यांदा त्यांना पायउतार व्हावे लागले. आता कोणाच्या गळ्यात नगराध्यक्ष पदाची माळ पडते याकडे सर्वांचे लक्ष लागल आहे. दरम्यान कविता दीपक वाकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.