Ambadas Danve, CM Devendra Fadnavis  Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve On Fuel : फडणवीस साहेब इंधन साठा पुरेसा आहे, तर मग देशात रांगा का? अंबादास दानवे यांचा सरकारला सवाल!

Ambadas Danve statement News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना काही प्रश्न उपस्थित करत डोळे उघडा आणि परिस्थिती पहा, असा टोला लगावला.

Jagdish Pansare

Devendra Fadnavis News : देशात, राज्यात गॅस, पेट्रोलसाठी सर्वत्र रांगा लागल्या आहेत. व्यावसायिक गॅस सिलेंडरसाठी लोक रात्री रस्त्यावर झोपून वाट पहात आहेत. दुसरीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देशात, राज्यात इंधनाचा पुरेसा साठा असल्याचे सांगत 'ऑल इज वेल' चा दावा करत आहेत. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना काही प्रश्न उपस्थित करत डोळे उघडा आणि परिस्थिती पहा, असा टोला लगावला.

मुख्यमंत्र्यांच्या दाव्यानंतर अंबादास दानवे यांनी एक्सवर पोस्ट करत देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांना काही प्रश्न केले आहेत. इंधन साठा पुरेसा आहे, असे आपण म्हणता, मग या प्रश्नांचीही उत्तरे द्या, देवेंद्र फडणवीसजी. इंधनाचा साठा पुरेसा आहे, असे तुम्ही सांगता, मग संपूर्ण देश रांगेत का उभा आहे? अशी विचारणा त्यांनी केली.

सीएनजी आणि इतर गॅससाठी रिक्षाचालकांना नोंदणी करत का फिरावे लागत आहे? रस्त्यावर गॅस, पेट्रोल भरण्यासाठी रिक्षांच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत. यातून वाहतुकीची कोंडी व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. मग तुमच्या पुरेशा इंधन साठ्याच्या दाव्याचे काय? असा सवाल केला आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपास येथील पंपांवर 1000 रिक्षा गॅसच्या प्रतीक्षेत उभ्या होत्या, हे कशामुळे? आता समृद्धी महामार्गावरील पंपही कोरडे पडल्याच्या बातम्या येत आहेत. इंधन कधी उपलब्ध होईल, याची माहिती कंट्रोल रूमकडे का नाही? अशी विचारणा दानवे यांनी केली आहे.

डेपोतून इंधन देतानाची क्रेडिट सिस्टीम अचानक कशी बदलली गेली? या मानमानीवर सरकार मूग गिळून गप्प का? ​साहेब, तुम्ही आणि तुमच्या सरकारने देशाला रांगेत उभे केले आहे! डोळे उघडा आणि परिस्थिती पहा. पुन्हा 'ऑल इज वेल' म्हणू नका, अशा शब्दात अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सरकारला टोला लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT