Maharashtra budget : सीएम फडणवीसांची रोजगार निर्माणबद्दल मोठी घोषणा; 50 लाख प्रत्यक्ष रोजगार निर्मितीमुळे मिळणार लाखो हातांना काम

CM Devendra Fadnavis : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दुपारी विधिमंडळात अर्थसंकल्प मांडला. यावेळी सीएम फडणवीस यांनी काही महत्वाच्या आणि मोठ्या घोषणा केल्या आहेत.
Devendra fadnavis
Devendra fadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दुपारी विधिमंडळात अर्थसंकल्प मांडला. यावेळी सीएम फडणवीस यांनी काही महत्वाच्या आणि मोठ्या घोषणा केल्या आहेत. अर्थसंकल्प मांडत असताना त्यांनी अजित पवार यांची आठवण आली. अजित पवार यांच्या स्मारकाबद्दल मोठी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. येत्या काळात महाराष्ट्र हे जागतिक उत्पादन केंद्र बनविण्याचे उद्देश आहे. त्यासाठी इन्व्हेस्ट महाराष्ट्र हा व्यासपीठ तयार करत आहोत. त्यासाठी येत्या काळात राज्यात 50 लाख प्रत्यक्ष रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे सीएम फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्र हे जागतिक उत्पादन केंद्र बनविण्याचे उद्देश आहे. त्यासाठी 50 लाख प्रत्यक्ष रोजगार निर्माण होईल. राज्याला अॅनिमेशन आणि गेमिंग क्षेत्रात अव्वल बनवणार आहोत. 250 पेक्षा अधिक स्टुडिओ बनवण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. मागच्यावेळी वेव्हज परिषद झाली. केंद्राच्या मदतीने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह सुरू करण्यात आली आहे. पुणे हे जीसीसीसाठी देशातील सर्वाधिक पसंतीचे स्थान ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

Devendra fadnavis
Pune BJP : केंद्र सरकारच्या पुण्यातील 'त्या' प्रकल्पाला भाजप नगरसेवकांचा अडथळा, अंतर्गत राजकारणामुळे कोट्यवधींचा निधी परत जाण्याचा धोका

जगात गेमिंग क्षेत्रात अव्वल होण्यासाठी महाराष्ट्रात 295 पेक्षा जास्त गेमिंग स्टुडिओ तयार करण्यासाठी प्रयत्न केले जातील. मुंबई व पुण्याला 50 अब्ज डॉलरचे केंद्र तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. महाराष्ट्रातील पुणे हे जीसीसीसाठी सर्वात पसंतीचे शहर ठरत आहे. 4 लाख उच्च कुशल रोजगार निर्मितीचे लक्ष आहे. निवडक 50 पर्यटन स्थळी पायाभूत सुविधा तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Devendra fadnavis
Shivsena Eknath Shinde: घरपट्टी माफ; शिंदे गटाच्या नगराध्यक्षांची धमाकेदार घोषणा, नागरिकांमध्ये आनंदाची लाट

अर्थसंकल्प मांडताना फडणवीस (Devendra fadnavis) यांनी स्प्ष्ट केले की, 30 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना हवामान, बाजारभाव माहिती दिली जात आहे. चारही कृषि विद्यापीठात एआयजी मदत घेतली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे. अॅग्रीस्टॅक योजना राबविण्यात येत आहे. 1 कोटी 31 लाख फार्मर आयडी फेब्रुवारीपर्यंत झाले आहे. चार वर्षांत भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील.

Devendra fadnavis
congress crisis : शेजारच्या राज्यात सत्तासंघर्ष तीव्र! 'सध्या प्रतीक्षा करू, अन्यथा...'; मुख्यमंत्रिपदाच्या वादात उपमुख्यमंत्र्याचा थेट हायकमांडलाच इशारा

आगामी दोन वर्षांत महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियानाची सुरुवात करण्यात आली. गोपीनाथ मुंडे मंडळात आता शेतमजुरांचा ही समावेश केला जाईल. महिला गोपालक, शेळी पालकांसाठी विशेष योजना राबविण्यात येईल. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 3 अंतर्गत 23 हजार किमी रस्ते व पुलांची कामे हाती घेतली जातील. 123 अब्ज डॉलरवरून 1500 अब्ज डॉलर्स पर्यंत वाढविण्याचे उद्देश आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.

Devendra fadnavis
Pune BJP : केंद्र सरकारच्या पुण्यातील 'त्या' प्रकल्पाला भाजप नगरसेवकांचा अडथळा, अंतर्गत राजकारणामुळे कोट्यवधींचा निधी परत जाण्याचा धोका

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com