Chandrakant Khaire-Sanjay Shirsat News Chhatrapati Sambhajinagar Sarkarnama
मराठवाडा

Chandrakant Khaire- Sanjay Shirsat : गणपतीच्या दारातच शिरसाट-खैरे तंडले! आरती करण्यावरून मानपान नाट्य अन् पाणउताराही!

A controversy erupted during Ganpati celebrations as Guardian Minister Sanjay Shirsat and Shiv Sena leader Chandrakant Khaire : खैरे यांच्या आधी दुसऱ्या नेत्यांचा सत्कार आणि सगळ्यात शेवटी खैरे यांना मान देत शिरसाट यांनी कुरघोडी केलीच.

Jagdish Pansare

Shivsena News : छत्रपती संभाजीनगरचे ग्रामदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संस्थान गणपतीची विसर्जन मिरवणूक नेहमीप्रमाणे राजकीय नेत्यांच्या मानपान नाट्यवरून रंगली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने सगळे राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते एकत्र येतात खरे, पण देवाच्या समोरही त्यांच्यातील वाद आणि कुरघोडी काही थांबत नाही. दहा दिवस गणेशोत्सव उत्साहात साजरा झाल्यानंतर आज गणरायाला निरोप देण्यासाठी सगळी राजकीय मंडळी संस्थान गणपती येथे जमली.

आरती करण्यासाठी नेते मंदिरात आले आणि खैरे यांनी सगळ्यात आधी आरतीचे ताट घेतले. झालं पालकमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांचा इगो दुखावला आणि त्यांनी सगळ्यांसमोरत 'तुम्हीच आरती करा' म्हणत त्रागा केला. यावर खैरे फार रिअॅक्ट झाले नाही, मग शिरसाट यांच्यासाठी दुसरी आरती आणण्यात आली. मग पुढे सगळं सुरळीत पार पडेल असे वाटत असताना खैरेंनी आधी आरती घेतली, याबद्दलचा राग शिरसाट यांनी सत्कार समारंभातून व्यक्त केला.

खैरे (Chandrakant Khaire) यांच्या आधी दुसऱ्या नेत्यांचा सत्कार आणि सगळ्यात शेवटी खैरे यांना मान देत शिरसाट यांनी कुरघोडी केलीच. या प्रकाराने शिरसाट यांना समाधान मिळाले असले तरी उपस्थित गणेशभक्त आणि सर्वसामान्यांना मात्र हा प्रकार फारसा आवडला नाही. संस्थान गणपती येथे राजकीय नेत्यांचा हा हटवादीपणा आता नवा राहिला नाही. होळी, शिवजयंती असो की गणेशोत्सव इथे नेत्यांमधील कुरबुरी या आता नित्याच्या बाबी झाल्याने त्याकडे कुणी फारसे गांभीर्याने पाहतही नाही.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट हे गेली तीस-पस्तीस वर्ष एकाच पक्षात काम करत होते. खैरे हे शिरसाट यांना ज्येष्ठ आहेत. वयाने आणि मानानेही, शिरसाट ते मान्यही करतात. अनेकदा पक्ष सोडल्यानंतरही शिरसाट यांनी खैरे यांच्याबद्दल आणि त्यांनी संभाजीनगर व मराठवाड्यात शिवसेना वाढवण्यासाठी कसे कष्ट घेतले? याचा उल्लेखही केला आहे. पण कधीकधी शिरसाट यांची सटकती आणि मग ते जाहीरपणे असे काहीतरी करून बसतात.

संस्थान गणपती येथून गणेश विसर्जनाच्या मिरवणूकाला प्रारंभ केला जातो. मानाच्या गणरायाचा रथ सगळे राजकीय नेते, मंत्री, आमदार, खासदार आणि गणेशभक्त स्वतः ओढतात आणि मिरवणूकीला सुरूवात करून देतात. तत्पुर्वी गणरायाची मान्यवरांच्या हस्ते आरती केली जाते. याच आरतीच्या मानावरून आज खैरे-शिरसाट यांच्यात किरकोळ वाद झाला. तो तिथेच मिटला असे वाटत असताना व्यासपीठावर खैरे यांचा सत्कार सर्वात शेवटी करत शिरसाट यांनी खोडी केलीच.

नंतर मात्र दोघांनी गणरायच्या मिरवणुकीचा रथ सोबत ओढला. बॅन्डच्या तालावर अनेकजण थिरकले. गणेशोत्सवाच्या मिरवणूकीला सुरूवात झाली आणि नेते आपापल्या दिशेने निघून गेले. पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे, आमदार संजय केनेकर, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, माजी आमदार अंबादास दानवे यांच्यासह अनेक नेत्यांनी यावेळी हजेरी लावली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT