Nanded Shivsena News Sarkarnama
मराठवाडा

Nanded Shivsena News : माजी मंत्री वायकर म्हणाले, हिंगोली लोकसभा विजयाचे पेढे आष्टीकरांच्या मळ्यातच खाऊ..

Marathwada Political News : आष्टीकर यांच्या शेतात घेतलेल्या निर्धार बैठकीला हिंगोलीतून इच्छूक असलेले अनेक नेते उपस्थितीत होते.

Laxmikant Mule

Marathwada Political News : शिवसेना ठाकरे गटाच्या संघटनात्मक बांधणी आणि विधानसभा मतदारसंघ निहाय आढावा बैठकीसाठी माजी मंत्री रविंद्र वायकर तीन दिवसांपासून नांदेडमध्ये तळ ठोकून होते. माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मळ्यात झालेल्या बैठकीत वायकर यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघ जिंकण्याचा निर्धार बोलून दाखवला. (Nanded Shivsena News) एवढेच नाही तर विजयाचे पेढे याच मळ्यात खाऊ, असे म्हणत हिंगोलीतून आष्टीकर यांच्या उमेदवारीचे संकेत दिल्याची चर्चा होत आहे.

हिंगोली (Hingoli) लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचा उमेदवार कोण असले? याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री रविंद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्या उपस्थितीत आष्टीकरांच्या शेतात झालेल्या या बैठकीची चांगलीच चर्चा होत आहे. सरत्या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी नांदेडात तीन दिवस तळ ठोकुन विधानसभा निहाय निर्धार सभा घेतल्या.

हादगाव विधानसभा मतदारसंघाची बैठक जिल्हाप्रमुख माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या शेतात घेण्यात आली. (Nanded) या सभेला मार्गदर्शन करताना माजी मंत्री रवींद्र वायकर यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघातून आपलाच उमेदवार निवडून येणार असून विजयाचे पेढे याच मळ्यात खाऊ, असा विश्वास व्यक्त केला. हा माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या हिंगोली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीचा संकेत मानला जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच हिंगोलीची जागा शिवसेना ठाकरे गट लढवणार हेही स्पष्ट झाले आहे. लोकसभा निवडणुक जवळ आल्याने शिवसेनेने निवडणूकीसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. तसेच संभाव्य उमेदवारांची चाचपणी करण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघाचा आढावा माजी मंत्री रवींद्र वायकर व संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी नुकताच घेतला.

हिंगोली लोकसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीच्या जागावाटपात शिवसेना ठाकरे गटाला सुटण्याची शक्यता आहे. गेल्यावेळी या मतदारसंघातून हेमंत पाटील हे शिवसेनेकडून लोकसभेवर निवडून गेले होते. पण शिवसेनेच्या बंडानंतर त्यांनी शिंदेंना साथ देण्याचा निर्णय घेतला. ही जागा ठाकरे गटाने लढवली होती, त्यामुळे सहाजिक या जागेवर त्यांचा दावा पहिला असणार आहे.

वायकर यांनी माजी आमदार आष्टीकर यांच्या शेतात घेतलेल्या निर्धार बैठकीला हिंगोलीतून इच्छूक असलेले अनेक नेते उपस्थितीत होते. यात माजी सहकार मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा, माजी आमदार संतोष टारफे, शिवसेना हिंगोली जिल्हा प्रमुख विनायक भिसे, हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. हिंगोली लोकसभा पुर्ण शक्तीने लढवुन गद्दारांना धडा शिकविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

तसेच हिंगोली लोकसभा मतदारसंघ `लढेंगे और जितेंगे` असा संकल्पही करण्यात आला. हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून माजी खासदार सुभाष वानखेडे, डॉ. जयप्रकाश मुंदडा, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या नावाची चर्चा आहे. अशावेळी माजी मंत्री रवींद्र वायकर यांनी नागेश पाटील आष्टीकर यांच्या उमेदवारीचे संकेत दिल्याचे बोलले जाते. या निर्धार सभेला माजी खासदार सुभाष वानखेडे यांची अनुपस्थिती सगळ्यांनाच खटकली.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT