Dhananjay Deshmukh Sarkarnama
मराठवाडा

Dhananjay Deshmukh Agitation : मी न्यायाची भीक मागतोय; पण आमच्या चांगुलपणाचा फायदा घेतला जातोय; धनंजय देशमुख

Santosh Deshmukh Murder Case : ज्या दिवशी गाड्या सापडल्या. त्याच दिवशी एक चिठ्ठीही सापडली हेाती, त्यात चार लोकांची नावे होती. माझ्या भावाच्या गाडीमागे अजून एक गाडी होती. याबाबतची कुठलीही माहिती कोणाकडून दिली जात नाही.

Vijaykumar Dudhale

Beed, 13 January : माझ्या भावाला आणि आमच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही. माझ्या चांगुलपणाचा फायदा कोण किती घ्यायला लागलं आहे, त्याबाबतचे स्पष्टीकरण मी देणार आहे. आम्ही चांगलं राहिल्याचा असा गैरफायदा घेतला जात असेल तर राहूनच काय उपयोग, असा उद्‌विग्न सवाल धनंजय देशमुख यांनी केला आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या खूनप्रकरणी वाल्मिक कराडवर खुनाचा आणि मोकाचा गुन्हा दाखल केला जात नाही. पोलिसांकडून तपासाची माहिती आम्हाला दिली जात नाही, याच्या निषेधार्थ संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले आहे. त्यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना पोलिसांवर आरोप केले.

धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) म्हणाले, आमच्या संयमाचा गैरफायदा घेतला गेला आहे. मी भावाला न्याय मागतोय, न्यायाची भीक मागतोय. पण ठराविकच आरोपी घेतले जातात. कोणावर काय तुमचा संशय आहे का, अशी आमच्याकडे एकदाही विचारणा केली जात नाही. आमच्याकडे घटनाक्रमही विचारला जात नाही. न्याय मिळावा; म्हणून मोर्चात जातोय, मुख्यमंत्री साहेबांकडे गेलो. या प्रकरणात आमचं काय म्हणणं आहे, तेही पोलिसांनी नोंदवून घेतलं पाहिजे.

ज्या दिवशी गाड्या सापडल्या. त्याच दिवशी एक चिठ्ठीही सापडली हेाती, त्यात चार लोकांची नावे होती. माझ्या भावाच्या गाडीमागे अजून एक गाडी होती. याबाबतची कुठलीही माहिती कोणाकडून दिली जात नाही. बीडच्या पोलिस अधिकाऱ्यांनी तपास लगेच सीआयडीकडे दिला. सीआयडीकडे दिलेला तपास योग्य आहे का, याबाबत आम्हाला का विचारलं नाही, असा सवालही धनंजय देशमुख यांनी केला.

धनंजय देशमुख म्हणाले, आतापर्यंतचा तपास असा असा आहे, तुम्हाला त्यात काय ॲडिशनल म्हणणे मांडायचं आहे का. याबाबतची काहीही माहिती पोलिस आमच्याकडून घेत नाहीत आणि त्यांच्याकडील तपास आम्हाला सांगत नाहीत. पोलिसांवर आम्ही कसा विश्वास ठेवायचा, अस सवाल धनंजय देशमुख यांनी केला.

मनोज जरांगे पाटील आले आहेत, त्यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला जात आहे. न्याय मागताना जर गुन्हा दाखल केले जात असतील तर आम्ही न्याय कसा आणि कोणाकडे मागायचा, असा सवालही त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT