Dhananjay Deshmukh News : आरोपी सुटले तर माझाही खून करतील, मी स्वतःला संपवून घेतो! धनंजय देशमुख यांचा इशारा

If the accused is released, they will kill me too - Dhananjay Deshmukh is afraid - warned to kill himself : आम्हाला न्याय मिळणार नसले तर मी स्वतःला संपवून घेतो. काय तपास सुरू आहे, कोणाला मदत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, माझ्या कुटुंबाला तपासाची माहिती का दिली जात नाही? असा सवाल धनंजय देशमुख यांनी उपस्थित केला.
Dhananjay Deshmukh News
Dhananjay Deshmukh NewsSarkarnama
Published on
Updated on

बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आठ आरोपींना अटक झाली आहे. या सर्वांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली जात आहे. (Beed Crime) मात्र यात खंडणीतील आरोपी वाल्मीक कराड याच्यावर मोक्काची कारवाई करण्यात आलेली नाही. खंडणी प्रकरणातूनच माझ्या भावाचा खून झालेला आहे.अशावेळी वाल्मीक कराड याला 302 च्या गुन्ह्यात आरोपी करावं आणि त्यालाही मोक्का लावावा, अशी मागणी सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केली.

हे आरोपी सुटले तर उद्या माझाही खून करतील, मग कुटुंबासाठी न्याय मागणारा कोणीही राहणार नाही.त्यामुळे उद्या सकाळी मोबाईल टाॅवरवर चढून मी स्वतःला संपवतो,असा इशारा धनंजय देशमुख यांनी दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला,पण आम्हाला तपासाची कुठलीही माहिती दिली जात नाही, आम्हाला तपासापासून दूर ठवले जात आहे.

Dhananjay Deshmukh News
Santosh Deshmukh Case: विष्णू चाटेचा मोबाईल शोधण्यासाठी CIDची दमछाक; सरपंच देशमुख हत्येच्या तपासासाठी...

सगळ्या आरोपींवर मोक्का लावला असताना वाल्मीक कराडवर का नाही? खंडणी प्रकरणातूनच माझ्या भावाचा खून झाला, खंडणी मागायलाच आरोपी गेले होते. हे आरोपी जर सुटले तर ते मलाही मारून टाकतील. जे माझ्या भावाचे झाले तेच माझेही होईल, अशी भिती धनंजय देशमुख यांनी माध्यमाशी बोलतांना व्यक्त केली. उद्या मी माझ्या कुटुंबासह मस्साजोग मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करणार आहे.

Dhananjay Deshmukh News
Ambadas Danve News : हत्या प्रकरणात सगळ्यांना 'मकोका'मग वाल्मीक कराड हे नाव कसे सुटते?

आम्हाला न्याय मिळणार नसले तर मी स्वतःला संपवून घेतो. काय तपास सुरू आहे, कोणाला मदत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, माझ्या कुटुंबाला तपासाची माहिती का दिली जात नाही? असा सवाल धनंजय देशमुख यांनी उपस्थित केला. टॉवरवर चढून मी स्वतःला संपवून घेणार आहे. मला या सगळ्यापासून भीती आहे. खंडणीतल्या आरोपीला वेगळी आणि खुनाच्या प्रकरणातील आरोपींवर वेगळी कारवाई केली जात आहे.

Dhananjay Deshmukh News
Devendra Fadnavis : महापालिका निवडणुका कधी होणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टच केले

यंत्रणा आम्हाला माहिती देत नाही, मुख्यमंत्र्‍यांना भेटून मी मागणी केली होती पण तरी यंत्रणा आम्हाला तपासाची माहिती देत नाही. आरोपी सुटले तर हे आरोपी माझा खून करतील.खंडणी ते खून प्रकरण एकमेकाशी जोडले गेलेले आहे.हा गुन्हा खंडणीतूनच झालेला आहे. मला आणि कुटुंबाला जर न्याय भेटत नसेल मी माझा स्वतःचा निर्णय घेतलेला बरा, अशी उद्विग्न प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com