Imtiaz Jaleel Meet Ambadas Danve News Sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jaleel Meet Ambadas Danve : संजय शिरसाट यांच्याविरोधात अंबादास दानवे- इम्तियाज जलील यांची युती! पुरावे देण्यासाठी घेतली थेट भेट

AIMIM leader Imtiaz Jaleel reaches Ambadas Danve’s office to submit evidence against Shiv Sena’s Sanjay Shirsat. : इम्तियाज जलील यांनी काल पत्रकार परिषद घेऊन संजय शिरसाट व त्यांच्या कुटुंबियांच्या नावे कुठे आणि किती एकर जमीन, भूखंड, प्लॉट खरेदी करण्यात आले आहे याचे कागदोपत्री पुरावे सादर केले होते.

Jagdish Pansare

Shivsena-AIMIM News : जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याविरोधात एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील व शिवसेनेचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यात युती झाली आहे की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. इम्तियाज जलील यांनी गेल्या काही दिवसांपासून संजय शिरसाट यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. शेंद्रा एमआयडीसीतील भूखंड, व्हिट्स हॉटेलचे प्रकरण आणि त्यानंतर आता शहरासह लगतच्या भागात सरकारी जमीन, प्लॉट बेकायदेशीररित्या खरेदी केल्याचे आरोप करत इम्तियाज जलील यांनी खळबळ उडवून दिली.

इम्तियाज यांच्या आरोपांवर संजय शिरसाट यांनी सध्या भाष्य करणे टाळले आहे. मात्र आपले काहीही होणार नाही, असा दावा करत शिरसाट यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले. दरम्यान शिवसेनेचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे शेंद्रा एमआयडीसीतील संजय शिरसाट यांनी आपल्या मुलाच्या नावावर खरेदी केलेल्या प्लॉटची कागदपत्रे व इतर माहिती मागवली होती.

येणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुद्दा उपस्थित करण्यासाठी आपल्याला ही माहिती हवी असल्याचे दानवे यांनी पत्रात नमूद केले होते. तर इम्तियाज जलील यांनी काल पत्रकार परिषद घेऊन संजय शिरसाट व त्यांच्या कुटुंबियांच्या नावे कुठे आणि किती एकर जमीन, भूखंड, प्लॉट खरेदी करण्यात आले आहे याचे कागदोपत्री पुरावे सादर केले होते. आज या सगळ्या कागदपत्रांची फाईल घेऊन इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) थेट अंबादास दानवे यांच्या क्रांती चौकातील संपर्क कार्यालयात धडकले.

दानवे यांना ही सगळी कागदपत्रे सुपूर्द करत संजय शिरसाट यांच्या या बेकायदेशीर मालमत्ता खरेदीची चौकशी करावी. या विरोधात विधिमंडळाच्या अधिवेशनात आवाज उठवावा, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांच्या आरोपांवर माध्यमांना प्रतिक्रिया देताना सोडा हो, इम्तियाज जलील यांच्या आरोपांवर काहीही होणार नाही, असे म्हटले होते.

इम्तियाज जलील यांनी याकडे लक्षवेधत माझी ही काही होईल अशी अपेक्षा नाही. परंतु विरोधी पक्षनेते म्हणून अंबादास दानवे यांनी हा विषय विधिमंडळात लावून धरावा आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या बेकायदेशीर कृत्यांना लगाम घालण्यास सरकारला भाग पाडावे, अशी मागणी केली. दानवे- इम्तियाज जलील यांच्या भेटीने जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आज माझी मातृभूमी प्रतिष्ठान संपर्क कार्यालय, संभाजीनगर येथे भेट घेतली. संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी नियम डावलून खरेदी केलेल्या अनेक मालमत्तांबाबत त्यांनी अधिकृत पुराव्यानिशी काही कागदपत्रे माझ्याकडे सुपूर्द केली. आगामी संपन्न होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात याबाबत आवाज उठवेल तसेच राज्यपाल यांना याबाबत माहिती देईल अशी, ग्वाही यावेळी दिल्याचे दानवे यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT