Ambadas Danve Meet Prakash Mahajan News : राणेंना अंगावर घेणाऱ्या प्रकाश महाजन यांची अंबादास दानवे यांनी घेतली भेट!

MNS spokesperson Prakash Mahajan, known for challenging Narayan Rane, recently met Shiv Sena leader Ambadas Danve : राज्य पातळीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा आणि हालचाली सुरू असताना अंबादास दानवे थेट प्रकाश महाजन यांच्या घरी गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
Ambadas Danve Meet Mns Leader Prakash Mahajan News
Ambadas Danve Meet Mns Leader Prakash Mahajan NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena-MNS Politics News : मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन भाऊ मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र येणार, अशा चर्चांना सध्या राज्यभरात उधाण आले आहे. यावर विविध राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यातच मंत्री नितेश राणे यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर भाष्य करताना एकही आमदार नसलेल्या पक्षाच्या आणि एका पक्षाकडे वीस आमदार असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याने आम्ही खूप घाबरलो, आहोत अशी खिल्ली उडवली होती.

यावर मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी नितेश राणे यांची लवंग, इलायची एवढी उंची असलेल्या राणे यांनी राज ठाकरे यांच्याबद्दल बोलू नये, अशा शब्दात पलटवार केला होता. (MNS) त्यानंतर या वादात माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही उडी घेतली. तसेच प्रकाश महाजन यांनी आमच्या नादाला लागू नये नसता त्यांना उलट्या करायला लावू, अशी धमकी दिली. या धमकीला भीक न घालता प्रकाश महाजन यांनी छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात येऊन दंड थोपटत राणे यांना आव्हान दिले.

याची काल राज्यभरात चर्चा सुरू असतानाच आज विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी प्रकाश महाजन यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. राणे यांना अंगावर घेतल्यानंतर दानवे यांनी घेतलेली ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. राज्य पातळीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा आणि हालचाली सुरू असताना अंबादास दानवे (Ambadas Danve) थेट प्रकाश महाजन यांच्या घरी गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

Ambadas Danve Meet Mns Leader Prakash Mahajan News
Narayan Rane यांनी धमकी दिली, Prakash Mahajan यांनी चौकात येवून दंड थोपडले, Sambhajinagar |

विशेष म्हणजे 'क्या हुआ तेरा वादा' या जनआंदोलनात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शहरातून ट्रॅक्टर मोर्चा काढला होता. क्रांतीचौक ते विभागीय आयुक्त कार्यालय दरम्यान शेकडो ट्रॅक्टर रस्त्यावरून धावले. विभागीय आयुक्तांना मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर अंबादास दानवे यांनी थेट प्रकाश महाजन यांचे घर गाठले. यावेळी दोघांमध्ये चर्चा आणि जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

Ambadas Danve Meet Mns Leader Prakash Mahajan News
Chandrakant Khaire-Ambadas Danve : खैरे-दानवे हातात हात घेऊन नाचले; शिवसेनेच्या वर्धापनदिनात दोन नेत्यांचे मनोमिलन!

एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्या एमआयडीसीतील प्लॉटवरून केलेले आरोप, राणे यांना प्रकाश महाजन यांनी दिलेले आव्हान या मुद्द्यावरही दोघांमध्ये चर्चा झाली. प्रकाश महाजन हे आमचे काका आहेत म्हणून त्यांची भेट घेण्यासाठी आलो असल्याचे अंबादास दानवे यांनी सांगीतले. एकूणच अचानक झालेल्या या भेटीने राज्यभरात शिवसैनिक आणि मनसे यांच्यातील जवळीक वाढत असल्याचे चित्र आहे.

Ambadas Danve Meet Mns Leader Prakash Mahajan News
Shivsena MNS Alliance Proposal : ठाकरे बंधूंच्या युतीसाठी अद्वय हिरेंचा 'मातोश्री'वर थेट प्रस्ताव...

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसोबत एकत्र येण्याच्या चर्चेवर लवकरच तुम्हाला बातमी देतो असे म्हणत एकत्र येण्याचे संकेत दिले होते. महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश कालच देण्यात आले आहेत. त्यामुळे उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चाही वाढल्या आहेत. अशातच शिवसेनेचे नेते असलेल्या अंबादास दानवे यांनी मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांची घेतलेली भेट महत्त्वाची मानली जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com