AIMIM News : मालेगावमध्ये 2008 मध्ये झालेल्या बाॅम्बस्फोट प्रकरणात एनआयएच्या विशेष न्यायालयाने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल पुरोहितसह सर्व सात आरोपींची मुक्तता केली. या निकालावर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली होती. सर्व आरोपी निर्दोष आहेत, तर मग बाॅम्बस्फोट कोणी घडवले? खरे आरोपी कोण आहेत? साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना अटक करण्याची हिमंत कोणी केली? असे अनेक प्रश्न इम्तियाज जलील यांनी उपस्थित केले होते.
मालेगाव स्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यामुळे न्यायव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे इम्तियाज जलील म्हणाले होते. त्यानंतर आता उद्या (ता.5) रोजी इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) हे मालेगावमध्ये जाणार आहेत. बाॅम्बस्फोटात मरण पावलेल्या पिडित कुटुंबांची ते भेट घेणार आहेत. जर मुंबई आणि मालेगाव स्फोट प्रकरणातील आरोपी निर्दोष ठरले, तर एक प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले,आणि दुसऱ्या प्रकरणात शांतता का?
समान न्याय कुठे आहे? असा प्रश्न इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे. जे लोक स्फोटात मारले गेले, त्यांच्या कुटुंबियांना आपण कसे तोंड दाखवणार? असा सवालही त्यांनी केला. मालेगाव (Malegaon) प्रकरणानंतर देशात भगवा दहशतवाद समोर आला होता, असे म्हणत न्यायालयाच्या या निकालाने न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील पाटील , मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी कोणाला तरी पकडून आणूयात जेलमध्ये टाकू? असे केले असेल का? काहीतरी तथ्य असल्याशिवाय त्यांनी संबंधितांवर आरोप लावले असतील का?
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर,लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहीत यांचा आरोपींमध्ये समावेश होता. एका समाजामध्ये दहशत निर्माण करण्यासाठी हा हल्ला घडवून आणण्यात आला होता, यासंदर्भातील पाठपुरावा हेमंत करकरे यांनी केला होता. दुर्दैवाने त्यांची हत्या करण्यात आली, असे सांगत इम्तियाज जलील यांनी न्यायालयाच्या निकालावर नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर इम्तियाज जलील उद्या मालेगावला जाणार आहेत.
यावेळी ते पिडित कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करून त्यांना न्यायासाठी लढण्याचे आवाहन करणार आहेत. मालेगाव येथे 29 सप्टेंबर 2008 रोजी बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात 6 जणांचा मृत्यू होवून शंभरहून अधिक लोक जखमी झाले होते. रमजानमध्ये लोक नमाज अदा करण्यासाठी जात असताना हा स्फोट झाला होता. 30 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावच्या आझादनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी स्फोटक कायदा आणि शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.