Malegaon Bomb Blast Case : मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी निर्दोष सुटताच तपास अधिकाऱ्याचं टेन्शन वाढलं... कोर्टाने दिले चौकशीचे आदेश!

Malegaon Case Planting RDX NIA Court : बागडे यांनी चतुर्वेदींच्या अनुपस्थितीत त्यांच्या घरात प्रवेश करून आरडीएक्स पेरून ते एटीएसच्या पथकाने जप्त केल्याचे जबाबात म्हटले होते.
NIA court orders probe into allegation of RDX planting in the Malegaon bomb blast case.
NIA court orders probe into allegation of RDX planting in the Malegaon bomb blast case. sarkarnama
Published on
Updated on

Malegaon Case News : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयए न्यायालयाने सातही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. हा निकाल देत असतानाचा आरोपींच्या घरात 'आरडीएक्स' पेरण्याबरोबरच जखमींची बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रे सादर करण्यात आल्याच्या प्रकाराची गंभीर दखल कोर्टाने घेतली आहे. या प्रकरणी तपास अधिकाऱ्याची दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) माध्यमातून याची चौकशी केली जावी, असे निर्देश कोर्टाकडून देण्यात आले आहेत.

एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात एटीएस अधिकारी शेखर बागडे यांनी आरोपी सुधाकर चतुर्वेदीच्या नाशिकच्या देवळाली कॅन्टोन्मेंट परिसरातील घरात आरडीएक्स पेरल्याचा आरोप करण्यात आला होता. पुरोहित यांच्या अपिलावर लवादासमोरील सुनावणीदरम्यान लष्करी मेजर आणि सुभेदाराच्या साक्षीच्या आधारे 'एनआयए'ने हा आरोप केला होता.

बागडे यांनी चतुर्वेदींच्या अनुपस्थितीत त्यांच्या घरात प्रवेश करून आरडीएक्स पेरून ते एटीएसच्या पथकाने जप्त केल्याचे जबाबात म्हटले होते. तसेच बागडे यांनी याबाबत तक्रार न करण्याची विनंतीही केल्याचा दावा या साक्षीदारांनी केला होता. दरम्यान बागडे यांनी त्यांच्यावरील आरोपांचे खंडन केले आहे.

NIA court orders probe into allegation of RDX planting in the Malegaon bomb blast case.
Nashik Kumbh Mela : कुणी निधी देता का निधी.. नाशिक महापालिकेवर कुंभमेळ्यासाठी कर्ज काढण्याची वेळ

एटीएसने सादर केलेल्या जखमींच्या वैद्यकीय पुराव्यांतदेखील अनियमितता असल्याचे नमूद करण्यात आले होते. काही जखमींची वैद्यकीय प्रमाणपत्रे एटीएस अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून बनावट डॉक्टरांनी तयार केली आहेत, तर काहींमध्ये फेरफार केल्याचे दिसून आल्याने विशेष न्यायालयाने ती स्वीकारण्यास नकार दिला. तसेच बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रांच्या स्वतंत्र चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

NIA court orders probe into allegation of RDX planting in the Malegaon bomb blast case.
Prithviraj Chavan: विजनवासात गेलेले पृथ्वीराज चव्हाण शिवसैनिकांमुळे पुन्हा चर्चेत; शिवसेनेचा मुंबईत आक्रमक मोर्चा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com